marathi ott 
मनोरंजन

'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म... 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट ओटीटीवर जात आहेत. परंतु तेथे मराठी चित्रपटांना म्हणावी तशी किंमत मिळत नाही किंबहुना मराठी चित्रपटांना तेथे डावलले जात आहे. त्यामुळे आता प्लॅनेट मराठीने खास मराठीतील ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्याचा निर्णय घेतला आहे. 'म मनाचा, म मराठीचा' ही टॅगलाईन घेऊन मराठी कलेला प्राधान्य देण्याचा उद्देश या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. भारतातील हा पहिलावहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. 

मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील चित्रपट, नाटक, वेबसीरीज लघुपट एका क्लिकवर येथे उपलब्ध होणार आहेत. केवळ मनोरंजन नाही तर पाककला, व्यायाम, लहान मुलाचे माहितीपर कार्यक्रम असे सर्व काही या ओटीटीवर उपलब्ध असेल. निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आकाराला आली आहे. विनायक दाबके, अमोद ओक हेही टीममध्ये आहेत.

निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील". 

अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, ''प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहीत आहे''. पुष्कर सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि.चे सीईओदेखील आहेत. संगीत संयोजक आदित्य ओक  म्हणाले, "प्लॅनेट मराठी ओटीटी हे पहिला-वहिला संपूर्णतः मराठीपण जपणारं माध्यम आहे. प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'

Latest Marathi News Live Update : उजनी धरण पंचवीस दिवसात शंभरीवरून 75 टक्क्यावर

Leopard Found Dead in Satara : साताऱ्यात उसाच्या फडात काय होतं? पाचटीत सडलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह; बळी गेला की घातपात?

HSC Science paper leak : बारावी सायन्स फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा

Bagalkot Shivaji Jayanti Violence : बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक; तीन पोलिस जखमी, मुख्य आरोपी तंजीरसह आठ जण अटकेत

SCROLL FOR NEXT