kangana ranaut, kangana ranaut news, kangana ranaut new home  SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: अतिक्रमण करणाऱ्यास गोळ्या घातल्या जातील..! कंगनाच्या दाराबाहेरची पाटी पाहून घाबरगुंडी

कंगनाने मुंबईत स्वतःचं नवीन घर विकत घेतलंय

Devendra Jadhav

Kangana Ranaut News: कंगना रनौत सोशल मीडियावर तिच्या विविध वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कंगना आणि वाद हे समीकरण ठरलेलं. कंगना पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आलीय.

कंगनाने मुंबईत स्वतःचं नवीन घर विकत घेतलंय. या घराबाहेर कंगनाने एक पाटी लावली आहे. त्यामुळे कंगना विषयी चर्चेचा आणि वादाचा नवीन मुद्दा उपस्थित झालाय.

(new sign board ouside of kangana ranaut new home)

कंगनाची मुंबईत तसेच मनालीमध्ये भव्य घरे आहेत. कंगनाने नुकतंच तिच्या मुंबईतील घराबद्दल एक व्हिडिओ शेयर केलाय. अभिनेत्रीने घराबाहेर एक विचित्र पाटी लिहिली आहे जी चर्चेत आहे.

ती पाटी म्हणजे.. "कोणतंही अतिक्रमण नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील. आणि यातून बचावलेल्या माणसांना पुन्हा गोळ्या घातल्या जातील," असं या पाटीत लिहिले आहे.

या पाटीमुळे कंगना रनौतच्या घरात कोणीही अनोळखी माणूस प्रवेश करण्यासाठी नक्कीच घाबरेल.

Kangana Ranaut News

उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा सत्तेत होती तेव्हा बृहन्मुंबई पालिकेच्या आदेशावरून कंगनाचं बांद्र्यातील पाली हिल मधलं घर तोडण्यात आलं होतं.

त्यामुळे भूतकाळ बघता कंगनाच्या या नवीन पाटीचा इशारा संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे का, अशी चर्चा सुरु आहे.

कंगनाने काहीच दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणचं कौतुक केलं होतं. दीपिका पदुकोणने ऑस्करला गेली होती.

कंगनानं दीपिकाची प्रशंसा करताना लिहिलं होतं की,''दीपिका पदूकोण किती सुंदर दिसत आहे,तिथे उभं राहून आपल्या देशाचं प्रतिनिधित्त्व करणं सोपी गोष्ट नाही.

आणि ते देखील इतक्या ग्रेसफुली आणि आत्मविश्वासानं बोलून..भारतीय महिला जगात बेस्ट आहेत हे दीपिकानं आज दाखवून दिलं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT