Saba-Hrithik Video Esakal
मनोरंजन

Saba-Hrithik Video: हृतिक तुला तर दोन मुलं मग ही छोटी मुलगी कोणाची ? गर्लफ्रेंडसोबत दिसला अन् ट्रोल झाला...

Vaishali Patil

नीता मुकेश अंबानी सेंटर (NMACC) लाँचचा दुसरा दिवसही चांगलाच गाजला. दुसरा दिवस अधिक भव्य दिव्य झाला कारण सेलिब्रिटींनी या ठिकाणी हजेरी लावली. यात टॉम हॉलंड, झेंडाया, गीगी हदीद आणि इतर अनेक आवडत्या सेलिब्रिटी यावेळी तेथे उपस्थीती होत्या. या कार्यक्रमात बॉलिवूड जगतातल्या अनेक जोडया दिसल्या.

दरम्यान, हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पोहचला होता. रेड कार्पेटवर दोघांनाही असे एकत्र बघून सोशल मिडियावर बरिच चर्चा सुरु झाली.

साबाने कस्टम-मेड साडी-गाउन परिधान केला होता. ज्यात ती खुप सुंदर दिसत होती तर हृतिकने ब्लॅक जॅकेट आणि मॅचिंग पँटमध्ये नेहमी सारखाच कमाल दिसत होता. रेड कार्पेटवर पापाराझीसाठी पोज दिल्याने दोघे एकमेकांपासून नजर हटवू शकतं नव्हते. दोघे हसत आणि एकमेकांचे कौतुक करताना दिसले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

आता नेटकरी त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. काहींना दोघांची जोडी खुप आवडली आहे. चाहत्यांनी त्याच्या जोडीचं कौतुक केलं आहे. तर काहींना या दोघांची जोडी खटकली आहे. त्यांनी दोघांना ट्रोल करायला सुरवात केली आहे.

एका नेटकऱ्यांने लिहिले आहे की,'हृतिकला तर दोन मुले होती ना ही मुलगी कधी झाली' तर दुसऱ्याने लिहिले की, 'ते दोघ एकत्र मुलीचं चांगले दिसत नाहीत', तर काहींना कंगणा राणौतची आठवण आली आहे.

सबासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी हृतिकने सुझान खानशी लग्न केले होते. 2000 मध्ये त्यांनी लग्न केले पण जवळपास 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले. हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.

सबा आझादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'रॉकेट बॉईज सीझन 2' मध्ये दिसणार आहे. ती पुन्हा एकदा वकील परवाना इराणीची भूमिका साकारणार आहे. Rocket Boyz 2 16 मार्च रोजी SonyLIV वर रिलीज होईल. रॉकेट बॉईजची पहिली सिरिज फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रीमियर होईल.

 तर, हृतिक रोशन दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT