sanket pathak wedding, suparna shyam wedding. sanket pathak wedding photos SAKAL
मनोरंजन

Nivedita Saraf: तुमच्या लग्नात मला.. संकेत - सुपर्णाच्या लग्नाला निवेदिता झाल्या प्रचंड भावुक

संकेतने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम सोबत सोबत लग्न केलंय

Devendra Jadhav

Nivedita Saraf Emotional Post on Sanket Pathak - Suparna Shyam Wedding: लग्नाची बेडी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. संकेतने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम सोबत सोबत लग्न केलंय.

संकेत आणि सुपर्णा या दोघांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय. या दोघांच्या लग्नात निवेदिता सराफ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

निवेदिता यांनी संकेत आणि सुपर्णा या दोघांना भरभरून आशीर्वाद दिले आणि त्या भावुक सुद्धा झाल्या.

(Nivedita Saraf Emotional Post on lagnachi bedi fame marathi actor Sanket Pathak - Suparna Shyam Wedding)

निवेदिता यांनी संकेत आणि सुपर्णा यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करून निवेदिता ताई लिहितात.

माझ्या प्रिय संकेत पाठक आणि सुपर्णा श्यामचे लग्न झाले हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता.

खूप आणि खूप आशीर्वाद.. अशी पोस्ट करत निवेदिता सराफ यांनी संकेत आणि सुपर्णाला आशीर्वाद दिले.

संकेत आणि सुपर्णा हे निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या फार जवळ आहेत. अशोक मामांचा जेव्हा ७५ वा वाढदिवस झाला तेव्हा निवेदिता आणि अशोक मामांना भेटण्यासाठी संकेत आणि सुपर्णा गेले होते.

या दोघांचे सुद्धा सराफ कुटुंबाशी खूप जवळचे संबंध आहेत. निवेदिता आणि अशोक संकेत आणि सुपर्णावर खूप प्रेम करतात.

या दोघांच्या लग्नाला अशोक मामा येऊ शकले नसले तरीही निवेदिता यांची उपस्थिती खास होती.

निवेदिता आणि अशोक यांनी संकेत - सुपर्णाच्या लग्नात खास डान्स केला. लग्नाच्या वरातीत संकेत - सुपर्णा सोबत निवेदिता सराफ यांनी धम्माल डान्स केला. सुपर्णा आणि संकेत हे दोघंही लोकप्रिय टेलिव्हिजन स्टार्स आहेत.

हे दोघे गेले अनेक वर्ष एकमेकांना डेटिंग करत होते. त्यातून आता त्यांच्या लग्नाच्या जोरात चर्चा रंगताना दिसत होत्या.

अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून संकेत - सुपर्णा यांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT