Nora Fatehi Instagram
मनोरंजन

Nora Fatehi ला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी सुकेशनं दिलेली मोठी ऑफर..अभिनेत्रीच्या खुलास्यानं सगळेच हैराण

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर संबंधित केस प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात नोरा फतेहीनं आपली साक्ष नोंदवली आहे.

प्रणाली मोरे

Nora Fatehi : नोरा फतेहीनं अखेर कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर संबंधित केसच्या प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आपली साक्ष नोंदवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसचं नाव या केसमुळे जोरदार चर्चेत होतं.

नोरा म्हणाली,''तिला सांगण्यात आलं होतं की अनेक अभिनेत्री सुकेशवर फिदा आहेत पण त्याला नोरा आवडते. एवढंच नाही जर सुकेशची गर्लफ्रेंड होण्यास ती तयार झाली तर तिला मोठं घरं दिलं जाईल''.

नोरा फतेही व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस,चाहत खन्ना,निक्की तंबोली सारख्या अभिनेत्रींची नावं मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जोडली गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार,जॅकलिन फर्नांडिस नंतर नोरा फतेहीने देखील सुकेशवर खोटं बोलण्याचा आरोप लावला आहे,

नोराने नुकतंच या केसप्रकरणात आपली साक्ष नोंदवलीय ज्यात तिनं खुलासा केला आहे की सुकेशने तिला वचन दिलं होतं की जर ती त्याची गर्लफ्रेंड बनली तर तिला मोठं आलिशान घर आणि लक्झरी लाइफस्टाईल जगता येईल यासाठी सगळं काही दिलं जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नोरा फतेहीनं कोर्टात नोंदवलेल्या आपल्या साक्षीमध्ये म्हटलं आहे की,''तिला सांगितलं होतं की कितीतरी अभिनेत्री सुकेशवर जीव ओवाळून टाकतात. सुरुवातीला माहित नव्हतं की सुकेश कोण आहे. नंतर माहिती पडलं की तो एलएस कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीत काम करत होता. माझं त्याच्याशी काहीच पर्सनल कॉन्टॅक्ट नव्हता आणि ना माझी कधी त्याच्याशी गाटभेट झाली होती''.

''मी त्याला तेव्हा पहिल्यांदा पाहिलं जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात त्याला माझ्या समोर आणलं होतं''. मीडिया रिपोर्ट्सनुसार,नोरानं आपल्या साक्षीत म्हटलं आहे की,सुकेश प्रकरणात ती एक 'व्हिक्टिम' आहे आणि या व्यतिरिक्त ती कुठल्याही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सामिल नाही. ईडीनं नोरावर महागड्या गाड्या,डायमंड सेट सोबतच डिझायनर बॅग्ज सुकेश कडून गिफ्ट म्हणून स्विकारल्याचा आरोप लावला होता.

हेही वाचा: शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT