On Shah Rukh's birthday, so many mobile phones were stolen from Mannat, three people were arrested SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुखच्या वाढदिवसाला मन्नतबाहेरुन तब्बल इतके मोबाईल चोरीला, तिघांना अटक

शाहरुख खानच्या वाढदिवसाला आलेल्या फॅन्सच्या मोबाईलची चोरी झाल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी केली कारवाई

Devendra Jadhav

Shah Rukh Khan News: शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला वाढदिवस झाला. शाहरुख खान दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी त्याच्या वाढदिवसाला त्याच्या फॅन्सला भेटायला मन्नतबाहेर आला होता.

शाहरुखला पाहायला त्याच्या फॅन्सनी प्रचंड गर्दी केली. शाहरुखचे यावर्षी पठाण, जवान हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाल्याने शाहरुखची एक झलक बघायला यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली.

त्याचा परिणाम म्हणजे शाहरुखच्या वाढदिवशी आलेल्या तब्बल ३० फॅन्सचा मोबाईल चोरीला गेला. यावर आता बांद्रा पोलिसांनी कारवाई केलीय.

(On Shah Rukh's birthday, so many mobile phones were stolen from Mannat, three people were arrested)

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींकडून नऊ मोबाईल जप्त केले. याप्रकरणी शुभम जमनाप्रसाद, मोहम्मद अली आणि इम्रान अशा तिघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली.

शाहरुखच्या वाढदिवसाला मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी बांद्रा पोलिस ठाण्यार FIR शाहरुखचे चाहते आले होते. तब्बल 30 चाहत्यांनी याप्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

किंग खानच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त त्याचं निवासस्थान म्हणजेच मन्नतबाहेर उभं असताना गुरुवारी रात्री त्यांचा फोन लुटला गेल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई केलीय.

शाहरुखच्या वाढदिवशी प्रेक्षकांना खास दोन गिफ्ट्स

शाहरुख वाढदिवशी त्याने नेटफ्लिक्सवर जवान सिनेमा रिलीज झाल्याची घोषणा केली. याशिवाय बहुप्रतिक्षित, बहुचर्चित डंकीचा टीझर त्याने रिलीज केला.

डंकीचा टीझर आल्यापासुन शाहरुख खानच्या डंकीची उत्सुकता शिगेला आहे. डंकी सिनेमात शाहरुखशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे. डंकी सिनेमा २१ डिसेंबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT