volodymyr zelenskyy  Instagram
मनोरंजन

Oscar 2023: युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांना ऑस्कर अकादमीनं आयत्यावेळी दिला मोठा झटका.. काय आहे प्रकरण?

खूप कमी लोकांना कदाचित माहित असेल की युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे राष्ट्रपती होण्याआधी प्रसिद्ध विनोदी अभिनेता होते.

प्रणाली मोरे

Oscar 2023: अमेरिकेत लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये १२ मार्च रोजी ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यावर सबंध जगाची नजर असते. आणि म्हणूनच कदाचित युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांना ऑस्करच्या मंचावर आपला संघर्ष मांडायचा होता.

तसा प्रस्ताव त्यांनी अकादमी समोर मांडला होता. पण आता कळतंय की अकादमीनं त्यांच्या प्रस्तावास नामंजूर केलं आहे. गेल्या वर्षी देखील ते ऑस्करमध्ये सामिल होऊ शकले नव्हते.

मीडिया रिपोर्टनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झेलेंस्की यांना व्हर्चुअली सहभाग घ्यायचा होता एक गेस्ट म्हणून. पण अकादमी यासाठी तयार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की,एका एजेन्सीनं झेलेंस्की यांचा हा प्रस्ताव अकादमी समोर ठेवला होता. पण याला नकार दिला गेला आहे.(Oscar 2023 acadamy rejects ukranian president volodymyr zelenskyy request to be guess on award show)

या प्रकरणावर अकादमी, डब्ल्यूएमई आणि एबीसीनं मौन साधलं आहे. माहितीसाठी इथं सांगतो की युक्रेनचे राष्ट्रपती बनण्याआधी वोलोदिमीर झेलेंस्की एक प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता होते.

रशियानं युक्रेन वर केलेल्या आक्रमणानंतर वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यात आणि कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं म्हणणं जगासमोर मांडलं आहे.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

आपल्या देशावर झालेल्या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती जगासमोर मांडण्यासाठी मोठमोठ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग झेलेंस्की यांनी याआधी देखील केला आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये वोलोदिमीर झेलेंस्की ६४ व्या ग्रॅमी अॅवॉर्मड्स मध्ये देखील सामिल झाले होते.

त्यांनी एका रेकॉर्डेड व्हिडीओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं होतं. पण ऑस्करच्या मंचावर मात्र झेलेंस्की यांचं आपलं म्हणणं मांडायचं स्वप्न अपूर्णच राहणार असं दिसतंय. सलग दोन वर्ष झेलेंस्की ऑस्कर सोहळ्यात व्हिडीओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडता यावं यासाठी प्रयत्न करत आहेत.

भारतात ऑस्कर सोहळा १३ मार्च रोजी सकाळी प्रसारित होईल. सकाळी सुमारे साडे पाचच्या सुमारास सोहळ्याच्या प्रसारणास सुरुवात होईल. जगातला हा सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

यावेळी ऑस्करमध्ये 'आरआरआर' देखील नामांकन यादीत आहे. सिनेमातील 'नाटु नाटु' गाणं ओरिजनल सॉंग कॅटॅगरित नॉमिनेट झालं आहे. आणि अर्थात प्रत्येक भारतीयाला आशा आहे 'आरआरआर' सिनेमा हा पुरस्कार नक्कीच जिंकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT