Sankarshan Karhade, Sankarshan Karhade news, niyam va ati lagu natak SAKAL
मनोरंजन

Sankarshan Karhade: रंगभूमीची पूजा आणि पाठीवर प्रशांत दामलेंची शाबासकी.. संकर्षणचा भारावून टाकणारा अनुभव

संकर्षणचं नवीन नाटक 'नियम व अटी लागू' हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरु आहे

Devendra Jadhav

Sankarshan Karhade Video: आज जागतिक रंगभूमी दिन. जगभरात रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षक आणि कलाकार हा दिवस उत्साहात साजरा करत असतील.

अनेक जण आजच्या खास दिवशी नाटकाचे प्रयोग करून रंगभूमी दिन उत्साहात साजरा करत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त खास पोस्ट केलीय.

(overwhelming experience of sankarshan karhade on world theatre day niyam va ati lagu natak and praise of prashant damle)

संकर्षणचं नवीन नाटक 'नियम व अटी लागू' हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरु आहे. या नाटकात संकर्षण सोबत बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख सुद्धा सहभागी आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे नाटक दिग्दर्शित केलंय. तर दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या प्रशांत दामले फॅन फाउंडेशन अंतर्गत नाटकाची निर्मिती केलीय.

संकर्षणने आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत संकर्षण प्रयोगापूर्वी रंगभूमीची पूजा करत असून त्याच्यासोबत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते अभिनेते प्रशांत दामले आणि सहकलाकार प्रसाद बर्वे दिसतोय.

संकर्षण रंगभूमीवर नारळ अर्पण करत असून त्याचं पाणी सर्वांना प्रसाद म्हणून देतोय.

हा व्हिडिओ शेयर करत संकर्षण लिहितो..“जागतीक रंगभूमी दिन” तुम्हा सगळ्यांना अनंत शुभेच्छा.. खरंच रंगभूमी वर वावरण्यासारखं सुख नाही.. अनंत जन्माची पुण्यायी म्हणुन हे भाग्यं मिळतं.. “नियम व अटी लागू..” च्या शुभारंभाचा हा व्हिडियो आहे..

संकर्षण पुढे लिहितो.. नाटकांच्या प्रयोगाचं पहिलं , अगदी पहिलं नारळ वाढवण्याचा मान मला निर्माते आणि दिग्दर्शक ह्यांनी दिला.. माझं भाग्यं कि , “प्रशांत दामले” हा माणुस बापासारखा शेजारी उभा राहून मला साथ देतो .. टाळी वाजवून बळ देतो..

माझं भाग्यं .. चंद्रकांत कुलकर्णी सरांसारखे दिग्दर्शक मला मिळतात.." अशी पोस्ट लिहून संकर्षणने भारावून टाकणारा अनुभव शेयर केलाय.

निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या तिघांचं एकत्रित असं ‘नियम व अटी लागू’ हे नवं नाटक रंगभुमीवर जोरात सुरू आहे.

स्वत: संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT