Pakistani Actor,host yasir hussain gets trolled after viral post on alia bhatt and ranbir kapoor Google
मनोरंजन

Alia- Ranbir च्या मुलीसंदर्भात पाकिस्तानातून केली गेली पोस्ट; शुभेच्छा न देता थेट...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या आयुष्यात एका छोट्या परीचं स्वागत केलं आहे.

प्रणाली मोरे

Alia- Ranbir Daughter: पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य माणूसच नाही तर तिथल्या कलाकारांना देखील बॉलीवूडविषयी आणि तिथं काम करणाऱ्या कलाकारांविषयी क्रेझ आहे. म्हणूनच तर पाकिस्तानी कलाकार अनेक भारतीय कलाकारांच्या आयुष्यावर कमेंट करताना दिसतात.आता पाकिस्तानमधील प्रसिद्ध व्ही.जे,अभिनेता आणि होस्ट असलेल्या यासिर हुसैननं रणबीर-आलियाच्या मुलीसाठी पोस्ट लिहिली आहे,ज्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे.(Pakistani Actor,host yasir hussain gets trolled after viral post on alia bhatt and ranbir kapoor)

आता आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली असेल की पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसैन आलिया-रणबीरच्या मुलीसाठी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला आहे,ज्याची इतकी चर्चा होत आहे. खरंतर आलियानं मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरवर जगभरातून लोक प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अशात आता पाकिस्तानी अभिनेता आणि होस्ट यासिरची पोस्टही चर्चेत आली.

Pakistani Actor,host yasir hussain gets trolled after viral post on alia bhatt and ranbir kapoor

यासिरनं त्याच्या पोस्टमधनं आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या नाहीत,तर दोन्ही देशांनी एकत्र येण्याच्या मोठ्या मुद्द्यावर तो बोलून गेला,ज्याचा इथे काय संबंध असं क्षणभर वाटेल तुम्हाला. अभिनेत्यानं पोस्टमध्ये आपला मुलगा कबीर हुसैनचा देखील उल्लेख केला आहे. यासिर हुसैननं आलिया आणि रणबीरचा फोटो आपल्या पोस्टमध्ये शेअर करत लिहिलं आहे की-''तरी आज कबीर खूप खूश आहे. दोन्ही देशांतील या मैत्रीच्या नात्यासाठी मी तयार आहे''.

यासिर हुसैनच्या या पोस्टवरनं आधी तर लोकांचा थोडा गोंधळ उडाला पण नंतर नेटकऱ्यांनी याचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. आलिया आणि रणबीरच्या मुलीच्या जन्मानंतर यासिर हुसैननं आपल्या मुलाचा उल्लेख करत दोन्ही देशांमधील मैत्रीवर भाष्य करणं चर्चेचा विषय बनला आहे. कितीतरी नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,यासिरनं या पोस्टच्या माध्यमातून आलिया-रणबीरच्या मुलीला आपल्या मुलासाठी मागणी घातली आहे. यासिरची पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे.आणि लोकांनी यावरनं यासिरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

यासिर हुसैन हा पाकिस्तानी इंडस्ट्रीतला प्रसिद्ध चेहरा आहे. तो शो चा होस्ट असण्यासोबतच एक अभिनेता देखील आहे. यासिर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री इकरा अजीजचा नवरा देखील आहे. इकरा आणि यासिरनं २०१९ मध्ये ग्रॅंड वेडिंग केलं होतं. लग्नानंतर २३ जुलै २०२१ रोजी यासिर आणि इकरानं आपल्या मुलाला जन्म दिला. कपलच्या मुलाचं नाव कबीर हुसैन आहे. यासिर हुसैननं आपल्या पोस्टमध्ये कबीरचा उल्लेख केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT