Panchayat Season 2 Review  esakal
मनोरंजन

Panchayat 2 Review: लांबलेला पण खिळवून ठेवणारा प्रवास

ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील (OTT News) मालिकांचा भडिमार सुरु आहे.

युगंधर ताजणे

Panchayat Season 2 Review

ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील (OTT News) मालिकांचा भडिमार सुरु आहे. यासगळ्य़ात कोणती मालिका चांगली असा प्रश्न नेटकऱ्यांना पडणं साहजिकच आहे. चॉईस हा मोठा प्रश्न (Web Serise) ओटीटीच्या प्रेक्षकांसमोर असला तरी काही वेबसीरिजनं मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं दिसून येतं. भारतीय वेबविश्वाच्या दुनियेत अशा काही मालिकांची नावं आवर्जुन सांगता येतील ज्यांची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम (Bollywood News) आहे. सेक्रेड गेम्सपासून या वेबमालिकांच्या लोकप्रियतेला जी सुरुवात झाली ती आता पंचायतच्या दुसऱ्या सीझनपर्यत कायम आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर अशा जॉनरच्याच सीरिजला (Web Series Review) प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो असा जो समज होता तो या मालिकेनं खोटा ठरवला आहे. सहजता, नाविन्यपूर्ण कल्पकता, प्रभावी दिग्दर्शन, लक्ष वेधून घेणारे संवाद, जोडीला खिळवून ठेवणारे कथानक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या मालिकेतील पात्रांचा अभिनय हे सारं थक्क कऱणारं आहे.

पंचायतचा पहिला सीझन प्रेक्षकांना भावला. हल्ली प्रेक्षकांवर मनोरंजनाच्या नावाखाली जे काही सादर केलं जात आहे त्यामध्ये क्राईम आणि अश्लीलतेचा कळस झाला आहे. अशात एखादी हदयाला हात घालणारी कथा, त्या कथेतील हवीहवीशी माणसं, त्यांचा मिश्किलपणा, त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, संघर्ष हे सारं कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात काही मालिका यशस्वी झाल्या आहेत. त्यामध्ये पंचायतचा क्रमांक सर्वात वरचा म्हणावा लागेल. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनी लिव्ह गुल्लक नावाच्या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी पसंत केले. चौकोनी कुटूंबातील भावनिक, कौटूंबिक बंध, त्याला विनोदाची झालर हे समीकरण प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेलं. अशातच अॅमेझॉन प्राईमवर पंचायतचा दुसरा सीझन प्रदर्शित होणं आणि तो चर्चेत येणं क्रमप्राप्तच होतं.

पहिल्या सीझनमध्ये फुलेरा गावात अभिषेक त्रिपाठीचा झालेला प्रवेश. सरकारी नोकरी सांभाळताना त्याची झालेली फजिती, गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना झालेला त्रागा हे सारं प्रेक्षकांना कमालीचं भावलं होतं. गावाचे सरपंच, गावचं राजकारण यासाऱ्याचा इच्छा नसतानाही अभिषेकला एक भाग व्हावं लागतं. सुरुवातीला यासगळ्याचा उबग येवून पुन्हा शहरात जावं असं वाटूनही गेलं. मात्र आपण समजतो तसं गाव नाही, माणसंही तशी नाही. ती प्रेमळ आहेत. संवादाचा पूल बांधल्यावर जे काही घडून येतं ते मात्र अभिषेकला खूप काही शिकवून जाणारं होतं. यासगळ्यात पहिल्या सीझनचा पसारा आटोपल्यावर दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यात दिग्दर्शक दिपक कुमार मिश्रा काय सादर करणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना होती. (Panchayat Season 2 Review in Marathi)

पहिल्या सीझनमधून जेवढी धमाल, मस्ती प्रेक्षक अनुभवतो तेवढीशी दुसऱ्या सीझनमध्ये अनुभवता येत नाही हे जरी खरं असलं तरी, दिग्दर्शकानं हा सीझन कमालीचा रंगतदार केला आहे. त्यातील वेगवेगळे प्रसंग उठावदार झाले आहे. अभिषेकच्या आयुष्यात झालेल्या एका मैत्रीणीची इंट्री हे सारं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं आहे. अनेक प्रसंग हे भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांना प्रभावित करुन जाणारे आहेत. पंचायत या मालिकेचं वैशिष्ट्य असं की, त्यातल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना वास्तविक आहेत असं वाटू लागतं. कारण त्या आपल्या मातीतल्या कथा आहेत. प्रसंग आहेत. आणि ते तसं प्रभावीपणे दिग्दर्शित करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. पंचायत सीरिजमधील भाषा, संवाद, चित्रिकरण, कलाकारांचा अभिनय हे सारं प्रेक्षक म्हणून थक्क करणारं आहे. (Panchayat season 2 release date amazon prime)

दुसऱ्या सीझनमध्ये आठ एपिसोडच्या माध्यमातून फुलेरा गावातील कथानक आपल्यासमोर उलगडत जातं. आणि आपण त्यात गुंतत जातो. फुलेरा गावात सरपंच मंजु देवी, ब्रज भुषण दुबे, प्रल्हाद पांडे, कार्यालय सहायक विजय आणि पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी यांचे वेगवेगळे किस्से पुन्हा एकदा आपल्याला खळखळून हसवतात आणि मनोरंजन करतात. पंचायत 2 पाहताना आपण कुठेही निराश होत नाही की आपल्याला रटाळपणाही जाणवत नाही. ही खरी तर दिग्दर्शकाची कमाल म्हटली पाहिजे. त्यानं सध्या क्राईम, अॅक्शन थ्रिलरच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीच्या पंचायतकडे खेचून आणले आहे.

पंचायतचा शेवटचा भाग भलेही थोड्या लांबीचा वाटत असला तरी तो नेहमीप्रमाणे संपूच नये असा वाटणारा आहे. मंजु देवीला आता वेगवेगळ्या गोष्टींशी डिल करावे लागत आहे. त्याचा त्रास पंचायत सचिव अभिषेकला होतो आहे. तो मुकाटपणे अनेक गोष्टी सहन करतो आहे. त्यातून आपल्याला नव्यानं काही शिकायला मिळते असा त्याचा दृष्टिकोन मात्र दिग्दर्शक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडतो. तोच आपल्याला शेवटपर्यत खिळवून ठेवतो. त्याचमुळे पंचायत प्रवास रंजक वाटू लागतो. त्याचे श्रेय कलाकार आणि दिग्दर्शकाला द्यावेच लागेल.

-------------------------------------------------------------------------

रेटिंग - ***1/2

वेब सीरिज - पंचायत 2

दिग्दर्शक - दिपक कुमार मिश्रा

कलाकार- जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैझल मलिक, चंदन रॉय, सानविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किम जोंग उन मुलीला सोबत घेऊन चीनमध्ये दाखल, उत्तर कोरियाची पुढची हुकुमशहा?

Pune News:'जमिनींवरील ‘एमआयडीसी’चे शिक्के काढणार'; पुरंदर विमानतळातून कपात केलेल्या क्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

Virat Kohli ला स्पेशल ट्रिटमेंट! थेट परदेशात फिटनेस टेस्ट, बाकीच्यांची बंगळुरूत; कोण पास, कोण फेल... ते वाचा

Latest Maharashtra News Updates : मनोज जरांगे-पाटील संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Pune Ganesh Festival:'भाविकांना देखाव्यांची भुरळ'; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्ते गर्दीने फुलले

SCROLL FOR NEXT