Pankaj Udhas speaks about Former Maharashtra C.M Vilasrao deshmukh. Google
मनोरंजन

Pankaj Udhas Birthday: 'तेव्हा विलासराव देशमुख होते म्हणूनच मला...'

ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांनी एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण शेअर केली होती.

प्रणाली मोरे

पंकज उदास(Pankaj Udhas) हे नाव घेतलं की मनात अन् कानात सुर उमटतात ते भावनांनी ओथंबून भरलेल्या गझलचे. 'चिट्ठी आए नं संदेश','न कजरे की धार','आदमी खिलौना है','चांदी जैसा रंग है तेरा' अशा कितीतरी पंकज उदास यांच्या गाण्यांनी चाहत्यांचं मन जिंकलं होतं. आजही ही गाणी मनात घर करुन आहेत. पंकज उदास यांच्या याच गायन क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी २००६ मध्ये पंकज उदास यांना तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्मश्री(Padmashree) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पण यामागे एक मजेदार गोष्ट आहे जी पंकज उदास यांनी शेअर केली होती. आज पंकज उदास त्यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत,त्यानिमित्तानं त्यांच्या पद्मश्री संदर्भातला एक किस्सा आम्ही शेअर करत आहोत.

पंकज उदास यांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला तेव्हा त्यांना यासंदर्भात काहीच माहित नव्हतं. इतकंच नाही जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Former Maharashtra CM. Vilasrao Deshmukh) यांनी पंकज उदास यांना 'पद्मश्री' संबंधित प्रश्न विचारला तेव्हा पंकज उदास यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नव्हतं. ही गोष्ट स्वतः पंकज उदास यांनी सांगितली होती. पंकज उदास यांची गाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना खूप आवडायची. एकदा या दोघांची एका समारंभात भेट झाली. या कार्यक्रमात पंकज उदास यांनी काही गाण्यांचा परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांना पंकज उदास स्टेजच्या मागील बाजूस असलेल्या ग्रीन रुममध्ये भेटले.

या भेटीदरम्यान त्यांच्यात छान गप्पाही रंगल्या. तेव्हा त्याक्षणी विलासराव देशमुख यांनी पंकज उदास यांना सांगितलं होतं की,ते पंकज उदास यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. एवढंच नाही तर त्यावेळी चक्क विलासराव देशमुख यांनी पंकज उदास यांना विचारलं होतं,''तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे का?'' बस्स...इतकं बोलून त्यांच्यातल्या गप्पा तिथेच थांबल्या होत्या. पण पुढे जे घडलं ते पंकज उदास यांच्यासाठी स्वप्नवत होतं.

यादरम्यानं पंकज उदास यांनी आपल्या करिअरची २५ वर्ष पूर्ण केली होती आणि ते कॅन्सर पीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य देखील करत होते. पंकज उदास यांना २००६ साली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री जाहिर करण्यात आला होता. आणि याविषयी पंकज उदास यांना काहीच माहित नव्हते. त्यांच्या एका मित्राने जेव्हा अभिनंदनासाठी फोन केला तेव्हा पंकज उदास आधी हैराण होऊन म्हणाले,''कशासाठी अभिनंदन?'' तेव्हा मित्रानं त्यांना पद्मश्री घोषित झाल्याचं सांगितलं होतं. आणि ती बातमी ऐकून आपल्या आनंदाला पारावर राहिला नव्हता असं पंकज उदास यांनी म्हटलं. आणि केवळ विलासराव होते,त्यांनी कामाची दखल घेतली म्हणून पद्मश्री मिळाला अशी भावूक प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT