Parineeti Chopra and Raghav Chadha spotted IND Vs AUS WTC final in London  SAKAL
मनोरंजन

WTC Ind vs Aus: इंडीया इंडीया! साखरपुड्यानंतर परिणीती - राघव टीम इंडियाला चियर करायला थेट लंडनमध्ये

सध्या भारत vs ऑस्ट्रेलिया WTC चा थरार सुरु आहे

Devendra Jadhav

Parineeti Chopra and Raghav Chadha News: सध्या भारत vs ऑस्ट्रेलिया WTC चा थरार सुरु आहे. लंडनमध्ये भारत vs ऑस्ट्रेलिया WTC ची मॅच सुरु आहे. हा सामना पाहायला परिणीती चोप्रा - राघव चड्ढा गेले होते.

परिणीती - राघव यांनी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांसोबत लग्न केलं. हे दोघे साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले. परिणीती - राघव लंडनमध्ये भारत vs ऑस्ट्रेलिया WTC पाहायला उपस्थित होते.

(Parineeti Chopra and Raghav Chadha spotted IND Vs AUS WTC final in London)

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा दोघांनी आनंद घेतला.

लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर हे दोघे उपस्थित होते. दोघेही एकत्र सामना पाहताना दिसले. एकीकडे राघव चढ्ढा गडद निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे,

तर दुसरीकडे परिणीती चोप्राबद्दल बोलायचे तर ती पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. दोघेही सनग्लासेस लावून एकत्र बसून सामना पाहत होते.

परिणीती आणि राघव या दोघांनाही क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. साखरपुड्याआधी दोघेही IPL सामना पाहायला सुद्धा उपस्थित होते.

या दोघांना त्यावेळी त्यांच्या फॅन्सनी स्टेडियममध्ये चिडवलं होतं. दोघांनी सुद्धा फॅन्सच्या प्रेमाचा स्वीकार केला होता.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली.

परिणीती आणि राघव या दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि डिझायनर मनीष मल्होत्रा ​​या ग्रँड रिसेप्शनचा भाग बनले. आता हे दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT