Parineeti Raghav Engagement  esakal
मनोरंजन

Parineeti Raghav Engagement : आता राघव चढ्ढा, यापूर्वी तीन अभिनेत्यांसोबत जोडलं होतं नाव!

राघव यांच्या नावावरुन प्रश्न विचारताच तिचा हसरा चेहरा आणि लाजणं यामुळे नेटकरी जे समजायचे ते समजून गेले.

सकाळ डिजिटल टीम

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज साखरपुडा होणार आहे. आपचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून परिणीतीच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अखेर या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची बातमी ऐकून चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे.

प्रख्यात अभिनेत्री प्रियंका चोप्राची बहिण एवढीच काही परिणीतीची ओळख नाही. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं परिणीतीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इश्कजादे नावाच्या चित्रपटापासून परिणीतीचा प्रवास सुरु झाला होता. त्यानंतर तिनं वेगवेगळ्या चित्रपटातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परिणीतीनं त्या नात्यावर जाहीरपणे भाष्य करण्यास टाळले होते. मात्र राघव यांच्या नावावरुन प्रश्न विचारताच तिचा हसरा चेहरा आणि लाजणं यामुळे नेटकरी जे समजायचे ते समजून गेले. राघव यांना पत्रकारांनी अनेकदा यावरुन विचारणा केली होती.त्यावरुन त्यांनी थोडे दिवस थांबा तुम्हाला आमच्या लग्नात नाचायलाच बोलावतो. अशी मिश्किल टिप्पणी केली होती.

यासगळ्यात परिणीती चोप्रा आणि बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. परिणीतीनं यापूर्वी बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यांना डेट केले होते असेही सर्च केले जात आहे. त्यात तिचे नाव अर्जून कपूर, उदय चोप्रा आणि आदित्य रॉय कपूरसोबत घेतले जात आहे. अर्थात यात कोणत्याही नात्यात परिणीतीचं नाव फार काळ घेतलं गेलं नाही.

परिणीतीचा जेव्हा इश्कजादे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा त्यात तिच्या जोडीला अर्जून कपूर अभिनेता होता. तो चित्रपट लोकप्रिय झाला. बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगली कमाईही केली होती. मात्र यासगळ्यात चर्चा रंगली ती परिणीती आणि अर्जून कपूरच्या रिलेशनशिपची. ते दोघेही एकमेकांना डेट करत आहे अशी चर्चा तेव्हा जोरदार व्हायरल झाली होती.

परिणीती आणि आदित्य रॉय कपूर हे दावत ए इश्कमध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट काय फारसा चालला नाही. त्याला प्रेक्षकांनी नाकारले. पण आदित्य कपूर आणि परिणीतीच्या नावाची चर्चा रंगली होती. अर्थात या दोन्ही सेलिब्रेटींनी यावर जाहीरपणे भाष्य करण्यास नाकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT