Parineeti- Raghav Engagement Esakal
मनोरंजन

Parineeti- Raghav Engagement: परिणीती-राघव साखरपुडा कन्फर्म.. तारीख-व्हेन्यू-आऊटफिट्सपर्यंतच्या अपडेट्स एका क्लिकवर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला होता.

प्रणाली मोरे

Parineeti- Raghav Engagement: बॉलीवूडची आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून परिणीती चोप्रा आहे. परिणीतीच्या साखरपुड्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.

परिणीती चोप्रा आणि आप पार्टीचे नेता राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. प्रियंका चोप्राची ही छोटी बहिण लवकरच आपल्या आयुष्याचा नवा प्रवास सुरु करणार आहे. (Parineeti Chopra- Raghav Chadha Engagement )

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी शनिवारी साखरपुडा होणार आहे. या दिवशी हे कपल एकमेकांना अंगठी घालून आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेतील. म्हटलं जात आहे की हा सोहळा एकदम खासगी स्वरुपाचा असणार आहे. या सोहळ्यात फक्त घरचेच कुटुंबिय असणार आहेत. समोर आलेल्या अपडेटनुसार या जोडीचा साखरपुडा दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये कपूरथला हाऊसमध्ये आयोजित केला जाणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची पूर्ण तयारी झालेली आहे. मीडियाला या सोहळ्यापासून दूर ठेवलं जाणार आहे. तर माहिती मिळत आहे की बॉलीवूडच्या इतर जोडप्यांप्रमाणे या जोडीनंही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यानं डिझाईन केलेल्या आऊटफिट्सला साखरपुड्यासाठी पसंती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्राला मनिष मल्होत्राच्या घरी स्पॉट केलं गेलं होतं. तेव्हा बातमी समोर आली होती की परिणीती आपल्या साखरपुड्यात घालणारा लेहेंगा ट्रायलसाठी मनिष मल्होत्राच्या घरी गेली होती.

परिणीती आणि राघव यांचे आऊटफिट्स मॅचिंग असणार आहेत. म्हटलं जातंय की राघव चड्ढा यांच्या राजकीय इमेजला लक्षात ठेवून आऊटफिट तयार केलं गेलं आहे. राघव हे अनेकदा प्लेन खादी सिल्कला पसंती देताना दिसतात.

परिणीती आणि राघव यांना गेल्या काही दिवसांत अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. यामुळे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. आता दोघांच्या साखरपुड्याच्या कन्फर्म बातमीनं त्यांचे चाहते मात्र सुखावणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT