Pathaan Box Office Collection Day 6 esakal
मनोरंजन

Pathaan Box Office Collection Day 6: मालामाल! विकेंडनंतरही 'पठाण'ची जादू कायम!जमवला 600 करोडचा गल्ला

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान स्टारर पठाण हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपटाची यशस्वी पत्रकार परिषद आयोजित करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.

दरम्यान या चित्रपटाने सहा दिवसातच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. पठाणने अवघ्या 6 दिवसांत भारतात 300 कोटींहून अधिक तर जगभरात 600 कोटींहुन अधिकची कमाई केली आहे. एका आठवड्यात हा चित्रपट जगभरात 1000 कोटींचा आकडा पार करेल असा दावाही करण्यात येत आहे.

25 जानेवारीला हा चित्रपट रिलिज झाला. सहा दिवस उलटले आहेत आणि चित्रपटाने बंपर कमाईही केली आहे. रमेश बाला यांच्या मते, पठाण या चित्रपटाने 30 जानेवारी म्हणजेच 6 व्या दिवशी 55 कोटींहून अधिक कमाई केली आहे, जी फक्त हिंदी भाषेत आहे.

मात्र, यात इतर भाषांचीही भर पडल्यास हा आकडा ६० कोटींच्या पुढे जाऊ शकतो. एकूण कमाईबद्दल बोलायचे तर ती 300 कोटींच्या पुढे जाईल. दुसरीकडे, जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपट 600 कोटींचा आकडा पार करत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, पहिल्या सोमवारी म्हणजेच सहाव्या दिवशी चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने केवळ 6 दिवसांत हिंदीत 294-295 कोटींची कमाई केली आहे. सोमवारच्या कमाईने पुन्हा एकदा नॉन हॉलिडेचा रेकॉर्ड 'पठाण'ने मोडला आहे. 'पठाण'चे बजेट 250 कोटी आहे, म्हणजेच हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. अशा प्रकारे चित्रपटाने त्याच्या बजेटच्या 18% पेक्षा जास्त कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT