Viral Video esakal
मनोरंजन

Viral Video : पठाणच्या गाण्यावर विराट-जडेजा मैदानात थिरकले! किंग खानकडून कौतूक, 'तुम्ही तर...'

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं चाहत्यांचे परिपूर्ण मनोरंजन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Movie Song King Khan Shah Rukh : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं चाहत्यांचे परिपूर्ण मनोरंजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसतो आहे. आतापर्यत या चित्रपटानं सहाशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. दीपिकाची भगवी बिकीनी यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाणनं नेटकऱ्यांना मात्र जशास तसे उत्तर दिले आहे.

शाहरुख खानच्या आस्क एसआरके नावाच्या शो नेहमीच चाहत्यांना उत्सुकता असते. यामध्ये चाहते त्याला हवा तो प्रश्न विचारु शकतात. शाहरुखही चाहत्यांना नाराज न करता बिनधास्तपणे उत्तर देतो. व्हॅलेटाईनच्या निमित्तानं देखील चाहत्यांनी त्याला काही खास प्रश्न विचारले आहेत. त्यावर शाहरुखनं चाहत्यांना दिलेल्या उत्तराची चर्चा सुरु झाली आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

शाहरुखच्या पठाणनं केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये विक्रमी कमाई केली आहे. अवघ्या तीन आठवड्यामध्ये या चित्रपटानं जगभरातूीन ९४६ कोटींची कमाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या काळात तीन वर्षांपासून शाहरुखच्या चाहत्यांना किंग खानच्या चित्रपटाची वाट पाहावी लागली होती. त्यानंतर त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटानं मात्र विक्रमी कमाई करुन लक्ष वेधून घेतले आहे.

पठाणमधील गाणीही प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांनी प्रेक्षकांना वेडं केलं आहे. या गाण्यांनी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना देखील भुरळ घातली आहे. त्या गाण्यावर कोहली, जडेजानं केलेला डान्स किंग खानला भलताच आवडला आहे. त्यानं त्या दोघांचंही मनपूर्वक कौतूक केलं आहे. किंग खान त्यांना म्हणाला आहे की, तुम्ही तर माझ्यापेक्षाही खूप छान डान्स करत आहात.

त्या दोघांनी डान्सचा व्हिडिओ पठाण फेम शाहरुखला टॅग केला होता. किंग खाननं त्यावर आम्हाला प्रतिक्रिया द्यावी. असं त्याचं म्हणणं होतं. सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT