Pathan Song besharam Rang Song controversy,Deshi Version of song, video viral on twitter Google
मनोरंजन

Pathan: व्हायरल झालं वादग्रस्त 'बेशरम रंग' गाण्याचं 'देसी व्हर्जन', नाचणाऱ्या मुलापुढं दीपिकाही पडली फिकी

'पठाण' सिनेमाचं 'बेशरम रंग' गाणं जेव्हापासून रिलीज झालं आहे,तेव्हापासून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

प्रणाली मोरे

Pathan: दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्यावरनं एकीकडे वाद छेडला गेला आहे, तर अशा संतापजनक वातावरणात आता कुणीतरी याचं देशी व्हर्जन शोधून काढलंय..अन् ते पाहून पाहणाऱ्याची हसून पुरती वाट लागली आहे. या व्हायरल व्हिडीओत ना कोणता भगवा कपडा,ना कोणता लक्झरी खर्च ना जबरदस्तीनं घुसडलेलं कोणतं ग्राफिक्स...अगदी सिंपल आणि नॅच्युरल पद्धतीनं या देशी 'बेशरम रंग' गाण्यानं सध्या सुरु असलेल्या वादाला थंडच करून टाकलं आहे.(Pathan Song besharam Rang Song controversy,Deshi Version of song, video viral on twitter)

पठाण सिनेमाचं बेशरम रंग गाणं जेव्हापासून रिलीज झालं आहे,तेव्हापासून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. गाण्याला जेवढी प्रशंसा मिळाली तेवढंच ट्रोल केलं गेलं. तर आता गाण्यावरनं सुरु झालेला वादाचं वादळ थांबायचं नावही घेईना. कितीतरी हिंदू संघटनांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. आणि आता या सगळ्या वादा दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात काही मुलांनी बेशरम रंग गाण्यावर डान्स केला आहे ज्याच्यापुढे दीपिकाही फेल ठरली आहे.

व्हिडीओत डान्स करणाऱ्या मुलांनी बेशरम रंग गाण्याच्या प्रत्येक छोट्या डिटेलिंगला नोट केलं आहे. दीपिकाचा सिझलिंग अवतारच नाही तर तिच्या डान्सला आणि हूक स्टेपला रीक्रिएट केलं आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो काही मुलं नदीच्या किनारी बेशरम रंग गाण्यावर परफॉर्म करत आहेत. अंडरगार्मेंट्स आणि लुंगीला बिकिनीसारखं परिधान करून दीपिकाच्या गाण्यातील प्रत्येक स्टेपला रीक्रिएट केलं आहे. तर काही मुलं दीपिका बनलेल्या एका मुलाच्या पाठी डान्स करताना मंत्रमुग्ध झालेली दिसत आहेत,त्यांनी तर प्रोफेशनल बॅकग्राऊंड डान्सर्सनाही मागे टाकलं आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं गेलं आहे की-'बेशरम रंग या गाण्याचे नवे व्हर्जन रिलीज केले गेले आहे. कारण कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत'.

सोशल मीडियावर आपल्या कल्पनेशक्ती पलिकडच्या अनेक गोष्टी घडताना दिसतात. या बेशरम रंग गाण्याच्या देशी व्हर्जनलाही ट्रोल केलं गेलं आहे. नेटकऱ्यांनी खूप फनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यानं म्हटलं आहे की-'या व्हिडीओत मुलांनी कपडेच घातलेले नाहीत. यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की-'अर्धी लुंगी नेसून डान्स..बॉयकॉट'. तर आणखी एकानं लिहिलं आहे-'हेच तर ओरिजनल आहे. पठाणच्या टीमनेच हे कॉपी केलं असेल. याला पण सोडलं नाही बॉलीवूडकरांनी'.

पठाण सिनेमातील बेशरम रंग गाणं १२ डिसेंबरला रिलीज केलं गेलं होतं. गाण्यानं रिलीज झाल्यानंतर एक तासातच एक मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला. युट्युबवर आतापर्यंत या गाण्याला ४७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांना गाणं भलतंच आवडलं आहे पण काही संघटनांनी मात्र गाण्यावर नको नको ते आरोप केले आहेत. दीपिकानं भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप केला गेलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT