Celebrities mourns death of PM Modis mother Google
मनोरंजन

Heeraben Modi Demise:हीराबेन मोदींच्या निधनावर कंगना,अक्षयच्या भावूक पोस्ट,'या' सेलिब्सनीही व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईनं ३० डिसेंबर,२०२२ रोजी अहमदाबाद येथील इस्पितळात पहाटे साडे तीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

प्रणाली मोरे

Heeraben Modi Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी ३० डिसेंबर,२०२२ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी अहमदाबाद येथील यूएन मेहता इस्पितळात सकाळी ३.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातध्ये पोहोचले आणि आईच्या अंत्ययात्रेत सामिलही झाले.

त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदाही दिला. जगभरातून अनेक लोक पंतप्रधानांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. तर आता अनेक बॉलीवूड कलाकारांनीही ट्वीट करत हीराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

कंगना रनौत,कपिल शर्मा,अनुपम खेर,अक्षय कुमार अशा अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदी यांच्या आईसाठी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत.(Celebrities mourns death of PM Modis mother)

बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारनं पंतप्रधान मोदी यांच्या दुःखात सामिल होत ट्वीटरवर पोस्ट लिहिली आहे. ''आईला आपल्यापासून दूर जाताना पाहणं यापेक्षा मोठं दुःख कोणतंच नसतं..'' अशा शब्दात अक्षयनं पंतप्रधानांचे सांत्वन केले आहे. अक्षय कुमारच्या आईचे देखील गेल्याच वर्षी निधन झाले होते.

अनुपम खेर यांनी पंतप्रधानांच्या आईचा फोटो शेअर करत ट्वीटरवर लिहिलं आहे की,''आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी! तुमची आई हीराबेन मोदी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं. तुमचं आईप्रती असलेलं नितांत प्रेम आणि आदर जगजाहिर आहे. आईचे तुमच्या आयुष्यात असलेले स्थान कोणीच घेऊ शकत नाही. पण आपण भारताचे सुपुत्र आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्यावर आहे,माझ्या आईचाही!''

कॉमेडियन कपिल शर्माने पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटरवर रीट्वीट करत लिहिलं आहे की,''आदरणीय पंतप्रधान मोदी जी,आईचं आपल्याला सोडून या जगातून निघून जाणं खूप दुःखदायी आहे. त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत असेल. देव त्याच्या चरणी तुमच्या आईला स्थान देवो ही प्रार्थना..ओम शांती..''

'दसवी' सिनेमाचे संवाद लेखक कवि कुमार विश्वास यांनी देखील पोस्ट करत लिहिलं आहे की,''आदरणीय पंतप्रधान मोदी जी..आई,वडील अन् गुरु कधीच दिवंगत होत नाहीत. ते आपल्या प्रेमाच्या,आशीर्वादाच्या आणि आपल्याला दिलेल्या चांगल्या शिकवणुकीच्या माध्यमातून कायम आपल्या मुलांच्या आणि शिष्यांच्या सोबत राहतात. तुमची प्रिय आई देखील तुमच्या चांगल्या कार्याच्या,संकल्पांच्या माध्यमातून जिवंत राहिल.देव त्यांना त्याच्या चरणी जागा देवो ही प्रार्थना. ओम शांती..''

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतनं देखील इन्स्टावर पोस्ट करत लिहिलं आहे की- ''देव आपल्या पंतप्रधानांना या दुःखद प्रसंगी धैर्य आणि शांती प्रदान करो..ओम शांती..''

PM Modi's Mother death..kangana ranaut tweet

'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील पंतप्रधानांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्वीट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

Khandale Shirur Highway Protest News : खंडाळे ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध; नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन

Latest Marathi News Update : बिहारमध्ये आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच दोन अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; विधान परिषदेत विरोधकांना मोठा धक्का

Weekly Horoscope: नवीन महिना, नवीन सुरुवात; नोव्हेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? ‘या’ राशींना फायदा, तर काहींनी घ्यावी काळजी

Pargav Water Crisis News : आंबेगावच्या पूर्वभागात घोडनदीकाठी गंभीर जलसंकट; डिंभे धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडे तीव्र मागणी

SCROLL FOR NEXT