Poonam Pandey Death Esakal
मनोरंजन

Poonam Pandey Death : तीन दिवसांपूर्वी काय करत होती पुनम पांडे? शेवटच्या व्हिडिओमधून धक्कादायक खुलासा

Poonam Pandey Death : मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असणारी सेलिब्रेटी पुनम पांडे हिचं गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन (Poonam Pandey Death) झाल्याची बातमी समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Poonam Pandey Death : मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असणारी सेलिब्रेटी पुनम पांडे हिचं गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन (Poonam Pandey Death) झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आज सकाळीच ही बातमी तिच्याच इंस्टा अकाउंटवरुन समोर आल्याने खळबळ उडाली. अनेकांनी तर तिचे सोशल मिडीया अकाऊंट हॅक झाल्याचा संशयही व्यक्त केला आहे.

पुनम पांडे हीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनम पांडे हिला सर्वाइकल कॅन्सर सारखा आजार झाला होता तर याबद्दल कोणतीही माहिती कधीच समोर आली नव्हती. अशातच पुनम पांडेने तीन दिवसांपुर्वीची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कायमच आनंदी उत्साही असणारी पुनम मृत्यूच्या आधी मोठ्या इव्हेंटमध्ये गेली होती. मृत्यूच्या 3 दिवस आधीचा पूनमचा व्हिडीओ समोर आला आहे.

ती दोन-तीन दिवसांपुर्वी गोव्यात एका कार्यक्रमासाठी गेली होती. यावेळी काढलेले फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. गोव्यात आलिशान क्रूझवर पार्टी असल्याचे तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओवरून दिसत आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती आंनदी दिसत आहे. स्लो मोशनमध्ये हा व्हिडीओ शुट करण्यात आला आहे.

पुनम पांडे हीची शेवटची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दोन तीन दिवसांपुर्वी पुनम अगदी ठणठणीत दिसत होती. तर अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

त्याचबरोबर इन्स्टा बॉलीवूडने या पेजनेदेखील तीचा काढलेला शेवटचा व्हिडीओ सोशल मिडीया अकाऊंटवरती शेअर केला आहे.

कोणत्या चित्रपटात चमकली होती पुनम? (Poonam Pandey Bollywood Career)

पुनमच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तिनं २०१३ मध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केली. पुनमच्या वाट्याला फारसे चित्रपट काही आले नाही. तिनं तिच्या बोल्डनेसमधून काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन (Poonam Pandey Reality Show) करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या द जर्नी ऑफ कर्मा, मालिनी अँड कंपनी, दिल बोले हडिप्पा नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

पुनम ही तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त प्रतिक्रियांसाठी ओळखली जात होती. तिनं कित्येकदा सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे तिला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सुनावले होते. पुनमनं काही रियॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. त्यात उल्लेख करायचा झाल्यास फिअर फॅक्टर - खतरो के खिलाडीचा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT