Popular Marathi television couple Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding Card glimpse Instagram
मनोरंजन

Hardeek- Akshaya Wedding Card: 'होऊ दे खर्च'...हार्दिक-अक्षयाच्या लग्नाच्या पत्रिकेवर चांदीचा विडा

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची खास मैत्रिण अभिनेत्री रुचा आपटेनं त्यांचे वेडिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे.

प्रणाली मोरे

Hardeek & Akshaya Wedding Card: मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. आजही या दोघांना कुणी हार्दिक आणि अक्षया म्हणून फारसं ओळखत नाहीत तर यांना त्यांच्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखांच्या नावावरनंच लोक ओळखतात. अक्षया म्हणजे पाठक बाई आणि हार्दिक म्हणजे राणा दा..बस्स नावच काफी...लोकांचा जल्लोष सुरू होतो. (Popular Marathi television couple Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding Card glimpse)

आता तर चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीय कारण लवकरच त्यांचे लाडके स्टार्स लग्न करतायत. सध्या लग्नसोहळ्याआधीच्या काही पारंपरिक सोहळ्यांचा हे दोघे आनंद घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या केळवणाच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता समोर आलं आहे दोघांच्या लग्नाचं वेडिंग कार्ड. आपल्या जवळच्या मित्र-परिवाराला,नातेवाईकांना ते सध्या हे वेडिंग कार्ड देताना दिसत आहेत.

अभिनेत्री रुचा आपटे जी अक्षया आणि हार्दिकची खास मैत्रिण आहे तिला नुकतंच या दोघांच्या लग्नाचं वेडिंग कार्ड मिळालं आणि ते सोशल मीडियावर शेअर करण्यापासून रुचा स्वतःला आवरु शकली नाही. रुचानं वेडिंग कार्ड शेअर करत लिहिलं आहे,''अक्षया आणि हार्दिक...लगीन घाई सुरु...''

वेडिंग कार्डचा लूक साधाच ठेवण्यात आलेला आहे. पांढरा रंग त्यासाठी हार्दिक आणि अक्षयानं निवडला आहे. दोघांची नावं या कार्डवर लाल रंगात लिहिलेली दिसत आहेत. वेंडिंग कार्डवरील चंदेरी रंगातलं विड्याचं पान सध्या आपल्याला आकर्षित करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षया आणि हार्दिकनं पत्रिकेवरील आपलं नाव मराठीत लिहिण्याला प्राधान्य दिलं आहे.

हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. नुकतंच पुण्यात काही जवळच्या नातेवाईकांच्या ,मित्रपरिवाराच्या उपस्थित कपडे खरेदीचा एक छोटासा समारंभ पार पडला. येवल्यात जाऊन अक्षयानं पैठणी विणण्याचा आनंद घेतला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांची बॅचलर पार्टीही नुकतीच पार पडली. या पार्टीची थीम दाक्षिणात्य संस्कृतीवर आधारित होती.

अक्षया आणि हार्दिक गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या लग्नाची पत्रिका जरी समोर आली असली तरी लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण बोललं जात आहे की २०२२ मधील डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT