Prabhas owns lavish villa in Italy Esakal
मनोरंजन

Prabhas Birthday: आदिपुरुष फ्लॉप झालाय पण टेन्शन नाय, परदेशातला व्हीला भाड्याने देऊन प्रभास कमावतोय कोट्यवधी

आज साऊथ सुपरस्टार प्रभासचा वाढदिवस

Vaishali Patil

Prabhas: आज साऊथचा सुपरस्टार प्रभासचा वाढदिवस आहे. साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा बहूप्रतिक्षीत चित्रपट आदिपुरुष नुकताच रिलिज झाला.

या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही महिन्यापासून खुप वाट पाहत होते मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.

चित्रपटातील कलाकार , लूक त्याचे डायलॉग हे सगळेच वादात अडकले. आदिपुरुष या चित्रपटामुळे सगळीकडे गोंधळ सुरू आहे.

त्यातच या चित्रपटातील कलाकार देखील खुप वादात अडकले. आदिपुरुषमधल्या राघव देश सोडून परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे.

तो सध्या अमेरिकेत आहे. दरम्यान प्रभासच्या संपत्तीबाबतही सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. प्रभास करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्यांच्या इटलीमधील एक मालमत्तेबाबात अनेक बातम्या समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात येत आहे की, प्रभासचा इटलीमध्ये एक आलिशान व्हिला आहे. हा आलिशान व्हिला भाड्याने देऊन प्रभास बक्कळ पैसे कमावतो. कलाकारांपासून ते पर्यटक आणि स्थानिक लोकांना प्रभास हा व्हिला भाड्याने देतो.

इतकच नाही तर हा व्हिलाच्या भाड्यातून प्रभास महिन्याला 40 लाख रुपये कमावतो. प्रभआसदेखील शूटिंगमधून वेळ काढून इटलीला जातो आणि त्याच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवतो.

यासोबतच प्रभआसचे हैदराबादमध्येही एक महागडे घर आहे. त्याच्या हैदराबादच्या घरात अनेक महागड्या कारचे कलेक्शनही आहे. त्यापैकी रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू आणि जग्वार अशी वाहने आहेत.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'आदिपुरुष' नंतर 'सालार', 'स्पिरिट' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सुपरस्टार प्रभास सध्या भारतातील टॉप पेड कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सुपरस्टार प्रभास एका चित्रपटासाठी 100-150 कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. बाहुबलीनंतर तर प्रभासने भारतातील पॅन इंडिया स्टार्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

बाहुबली नंतर, अभिनेता साहो, राधे श्याम आणि आदिपुरुष मध्ये दिसला. मात्र हे तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. तरही प्रभासच्या स्टारडमवर याचा कसलाच फरक पडलेला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT