Prajakta Mali Instagram
मनोरंजन

Prajakta Mali: 'यंदाचं नवं वर्ष shooting set वर असताना देखील...', प्राजक्ताची गुढीपाडवा स्पेशल पोस्ट चर्चेत

गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्राजक्ता माळीनं शेअर केलेले लाल रंगाच्या साडीतील फोटो आणि शुभेच्छांची नोट सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले आहेत.

प्रणाली मोरे

Prajakta Mali: गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच सोशल मीडियावर शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. आज एक गोष्ट मात्र दिसून आली ती म्हणजे बऱ्याच मराठी सेलिब्रिटींनी शूटिंगमधून ब्रेक घेत गुढीपाडवा आपल्या कुटुंबासोबत साजरा केला.

अर्थात सोशल मीडियावर अनेकांनी त्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केल्यानं प्रत्येकाचा आनंद त्याच्या त्याच्या चाहत्याला अनुभवता आला. नेहमीप्रमाणे आजच्या दिवशीही प्राजक्ता माळीची गुढीपाडवा स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ते तिच्या फोटोसोबत जोडलेल्या खास नोटमुळे.

चला जाणून घेऊया प्राजक्तानं काय लिहिलं आहे त्या गुढीपाडवा स्पेशल पोस्टमध्ये. (Prajakta Mali Gudhi Padwa Special post 2023)

प्राजक्ता माळी साधी शिंकली तरी आजकाल तिची बातमी होत असल्याचं दिसत आहे. नुकतंच तिनं लग्नाविषयी श्रीश्रीरविशंकर या तिच्या अध्यात्मिक गुरुंना विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ भलताच चर्चेत आला होता.

प्राजक्ता तशी अनेकदा केवळ तिच्या सिनेमाविषयी नाही तर इतरही अनेक राजकीय सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होते. अनेकदा तिच्या मतांचे समर्थन केले जाते तर त्यासोबत तिच्यावर ट्रोलर्स निशाणाही साधतात.

असो प्राजक्तानं आता पोस्ट केली आहे ती आहे गुढीपाडव्याच्या शुभेच्छांची विस्तृत पोस्ट. या पोस्टसोबत तिनं शेअर केलेले लाल रंगाच्या साडीतले फोटो लक्ष वेधून घेत आहेत अन् कलिजा खल्लास करत आहेत.

प्राजक्तानं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना लिहिलं आहे,''आज चैत्र शुद्ध प्रतिपदा; आजपासून शालिवाहन शके १९४५ शोभन संवत्सरास प्रारंभ होत आहे. तुम्हा सर्वांना मराठी- हिंदू किंबहुना ‘भारतीय’ नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा…
.
यंदाचे वर्षी आपलं नव वर्ष आणि भारतीय राष्ट्रीय सौर वर्ष एकाच दिवशी अर्थात आजपासून सुरू होतय. कित्येक वर्षांनी असा योग येतो.
त्यामुळे सर्वांना दुहेरी शुभेच्छा. 🌟🌟🌟
.
#गुढीविचारांची
.
हे झालं संस्कृतीविषयी, तेवढाच रस आपल्याला खाद्य संस्कृतीतही आहे. 🥰
तर यंदाचं नवं वर्ष shooting set वर असताना देखील; श्रीखंड- पुरी, बटाटा भाजी, पापड यावर ताव मारून साजरं करण्यात आलय. 🥰
.
(पुऱ्या गरम होत्या, फोटो काढण्यात वेळ नाही घालवला…😬Set च्या मालकांनी जेवण पाठवलं.🥰#luckyme )
.
माझ्या आयूष्यात “राम” आहे, तुमच्याही आयूष्यात तो भरून राहो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT