Prarthana Behere Post: मराठी मनोरंजन विश्वात बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौदर्यांच्या आणि अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यात एक आघाडीचं नावं म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे. छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या प्रार्थना बेहेरेने अल्पावधितच तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
तिने 'मितवा' या चित्रपटातुन मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केलं. काही दिवसांपुर्वी तिने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम केले. या मालिकेतील तिच्या नेहाच्या पात्राने तिला घराघरात लोकप्रिय केले.
नेहमी चर्चेत राहणारी प्रार्थना ही सोशल मीडियावर देखील खुप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. तिचे चाहतेही तिच्याबद्दल जाणुन घेण्यासाठी उत्सूक असतात.
अशातच प्रार्थनाची एक इंस्टास्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तिने तिच्या स्टोरीत लिहिलं की, 'जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी व्यायाम किंवा डाएट करण्याची काही गरज नाही. त्यासाठी फक्त एखाद्या चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा'. तिने ही पोस्ट शेयर केली आहे आणि त्यासोबत हसण्याचा इमोजी देखील शेयर केला आहे.
आता वजन कमी करण्यासाठी तिने हा हलकाफुलका सल्ला दिला आहे. मात्र तिच्या स्टोरीची चर्चा रंगली. आता तिने ही स्टोरी हेतूपुरस्सर टाकली आहे की फक्त मजेदार वाटली म्हणुन टाकली हे तर प्रार्थनाच सांगू शकते.
प्रार्थनाने मराठीच नाही तर हिंदी भाषेतही अभिनय केला आहे. . तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. ती तिच्या आगामी इंद्रधनुष्य सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.