priya sachdev
priya sachdev esakal
मनोरंजन

Priya Sachdev : करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची ‘बीबी नंबर 1’; एका पोरांची आई असूनही अदा पहाल तर घायाळ व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

९० च्या दशकात बॉलिवूड गाजवलं ते करिश्मा कपूरनचं. तिची जोडी गोविंदा, सलमान खान, अजय देवगन यांच्यासारख्या सुपरस्टार सोबत गाजली. करिश्मा पडद्यावर गाजली पण तिच्या पर्सनल लाईफमध्ये वादळ उठलं होतं.

करिश्माचा विवाह २००३ मध्ये संजय कपूर यांच्याशी झाला. लग्नानंतर करिश्माने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. दोघेही काही काळ एकत्र राहिले. संजयपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केले.

प्रिया आणि संजयची जोडी

प्रिया सचदेव या मॉडेल आणि बिझनेस वुमन आहेत. त्या अनेक वर्षांपासून मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहेत. प्रिया यांनी 1999 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) मधून बिझनेस मॅनेजमेंटसह गणितात दुहेरी शिक्षण घेतले आहे.

प्रिया सचदेव यांनी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये तसेच अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. त्यांनी यश चोप्रा यांच्या 'नील' ऍन्ड ' निक्की' या चित्रपटातही अभिनय केला होता.

प्रिया योगाला जास्त महत्त्व देते

प्रियाने अमिताभ बच्चन आणि करीना कपूर यांच्यासोबत जाहिरातीही केल्या आहेत. प्रिया व्यवसायाने बिझनेसवुमन आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये त्यांचे फॅशन बुटीक्स आहेत. प्रिया सचदेव या सोना ग्रुपच्या ग्रुप डायरेक्टर आहेत.

त्या सोना ऑटोकॉम्प होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी प्रियाने 2006 मध्ये विक्रम चटवालसोबत लग्न केले होते.

प्रियाचा ग्लॅमरस लुक

मात्र 2011 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर प्रिया आणि संजय यांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर  २०१७ मध्ये लग्न केले. दोघांनाही एक मूलगा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT