Protest Against Priyanka Chopra in Lucknow Google
मनोरंजन

Priyanka Chopra: 'नवाबांच्या शहरात तुझा निषेध करत आहोत...', लखनौमध्ये प्रियंकाला का होतोय विरोध?

प्रियंका चोप्रा सध्या भारतात आली असून यानिमित्तानं ती अनेक शहरांना भेटी देऊन सामाजिक कार्याचा आनंद घेताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी लखनौ येथील युनिसेफच्या ऑफिसला भेट दिली. तिनं औरंगाबाद येथील एक शाळा आणि आंगणवाडी केंद्राला देखील भेट दिली,जिथे तिनं मुलांसोबत वेळ घालवला,त्यांच्याशी संवाद साधला.

मुलींच्या विरोधात होत असलेला भेदभाव आणि त्यांच्यावरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रियंकाचा या दौऱ्यामागचा हेतू होता हे तिच्या युनिसेफ आणि त्यासारख्या इतर संस्थांच्या भेटीतून निदर्शनास आले. यादरम्यान प्रियंकाला लखनौमध्ये विरोध करणारी घटनाही समोर आली. पण याचं कारण काय आहे,चला जाणून घेऊया सविस्तर याविषयी.(Protest Against Priyanka Chopra in Lucknow)

त्याचं झालं असं की, प्रियंका लखनौमध्ये असताना तिला भेटण्यासाठी एक तरुण विजेच्या तारांची लांबलचक भिंत पार करुन आला,त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली. पण त्याबरोबर लखनौ येथील एका संघटनेने प्रियंकाच्या लखनौमधील दौऱ्याला विरोध करणारे पोस्टर्स लावत त्यावर लिहिले,''नवाबांच्या लखनौ शहरात तुझे स्वागत नाही''. यावरनं स्पष्ट होतं की प्रियंका लखनौला आलेलं काही लोकांना खटकलं.

दौऱ्याआधी प्रियंकानं एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं होतं की,''आता मी लखनौ शहरात आहे,युनिसेफला भेट देण्यासाठी. मी या दौऱ्याची मनापासून वाट पाहत होते. मी माझ्या लहानपणी काही वर्ष लखनौच्या एका शाळेत काढली आहेत. माझ्या ओळखीतली काही कुटुंब आणि मित्रपरिवार येथे राहतो. उत्तरप्रदेश महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी चांगलं शहर बनलंय याविषयी जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. मला इथल्या बदलांना,सुधारणांना जाणून घ्यायची मनापासून इच्छा आहे. भारतात आजही लैंगिक असमानतेमुळे महिलांवर अत्याचार होताना दिसून येतो''.

प्रियंका पुढे म्हणाली, ''मुलींवर होणारे अत्याचार आणि भेदभाव संपुष्टात यावेत यासाठी लखनौमध्ये कार्यरत असणाऱ्या युनिसेफला मला भेट द्यायची आहे. या कार्यात त्यांना येणाऱ्या अडचणी मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यासंदर्भात माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. मी नेहमी बोलत आले आहे की,समाजाला उज्वल भविष्य देण्याची मोठी ताकद स्त्रियांमध्ये आहे. त्या मनात आणलं तर मोठ्यातल्या मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतात''.

प्रियंकाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'जी ले जरा' सिनेमात दिसेल. सिनेमा संदर्भात बोलताना प्रियंका म्हणाली,''मी माझ्या करिअरचा मोठा काळ सिनेसृष्टीत पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाखाली घालवला आहे. हिरो ठरवतो,सिनेमा कुठे शूट करायला हवा,सिनेमात हिरॉईन कोण असेल. हे सगळं नैराश्यात नेणार होतं. आपण अशा युगात राहत आहोत जिथे महिलांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतः सक्षम होण्याची गरज आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT