Pushpa 2 Item song, samantha ,nora not in que...one famous actress name viral Esakal
मनोरंजन

Pushpa 2: ना समंथा, ना नोरा.., 'पुष्पा 2' मध्ये 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री थिरकणार आयटम सॉंगवर

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' सिनेमाप्रमाणेच त्यातील 'ऊ अंटावा' या समंथाच्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली होती.

प्रणाली मोरे

Pushpa 2: अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २' सिनेमातील 'ऊ अंटावा' गाण्याला कोणीच विसरू नाही शकत. या गाण्यात समंथाचं दिसणं आणि नाचणं पाहून अनेकांचा 'कलिजा खल्लास झाला होता' असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हे गाणं सिनेमा इतकंच कमालीचं हिट ठरलं. संपू्र्ण देशाला या गाण्यानं आपल्या तालावर ठेका धरायला लावला. (Pushpa 2 Item song, samantha ,nora not in que...one famous actress name viral)

आता या सिनेमाचा दुसरा भाग 'पुष्पा २' येतोय. यादरम्यान चर्चा रंगली आहे ती सिनेमातील आयटम सॉंगची. या गाण्यात कोणती अभिनेत्री दिसणार यावरनं एक-दोन नाही तर तीन-तीन नावं चर्चेत असलेली पहायला मिळत आहेत. बोललं जात आहे की यावेळेला सिनेमात जी कोणी अभिनेत्री आयटम सॉंग करले तिची सिनेमातही भूमिका असणार आहे.

एका वेबसाईटला मिळालेल्या वृत्तानुसार, 'पुष्पा २' मध्ये देखील आयटम सॉंग असणार आहे. जी अभिनेत्री हे आयटम सॉंग करेल तिची सिनेमातही भूमिका असणार आहे. असंही बोललं जात आहे की तिच्यावर सिनेमात अल्लू अर्जूनची व्यक्तिरेखा लट्टू झालेली देखील दाखवलं जाणार आहे. याआधी बोललं जात होतं की 'ऊ अंटावा' ला मिळालेल्या यशानंतर समंथा रुथ प्रभु पुन्हा 'पुष्पा २' मध्ये दिसणार आहे. तर,नोरा फतेहीचं नाव देखील आयटम सॉंगसाठी समोर येत होतं. पण आयटम सॉंग करणारी अभिनेत्री सिनेमात भूमिकाही साकारणार आहे त्यामुळे नोराचं नाव आता मागे पडत आहे.

समंथा रुथ प्रभू आणि नोरा फतेही नाही तर 'पुष्पा २' मध्ये 'बाहुबली गर्ल' तमन्ना भाटिया आयटम सॉंग करणार आहे. अधिकृतरित्या अजूनही तमन्नाचं नाव कुठेही सांगितलं गेलेलं नाही. पण दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन तमन्ना सोबत काम करायला इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. आता नक्की तमन्नाच ते आयटम सॉंग करणार का हे काही दिवसांत कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT