Rahul Mahajan News Rahul Mahajan News
मनोरंजन

Rahul Mahajan : टीव्ही शोमध्ये राहुलने १८ वर्षांनी लहान पत्नीवर केले भाष्य

लग्नानंतर काही महिन्यांनी वेगळे झाले तर त्याला लग्न म्हणता येणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Rahul Mahajan News तुम्ही राहुल महाजनला (Rahul Mahajan) ‘बिग बॉस’पासून ‘स्मार्ट जोडी’पर्यंत अनेक रिॲलिटी शोमध्ये बघितले असेल. राहुल महाजन प्रोफेशनल लाइफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. त्याने तीन लग्ने (Marriage) केली आहेत. लग्न आणि घटस्फोट यावरून तो वादात सापडला आहे. ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये राहुलने लग्न आणि घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने सांगितले होते.

राहुल महाजनने २०१८ मध्ये रशियन मॉडेल नतालिया इलिनासोबत तिसरे लग्न केले. नतालिया राहुलपेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. वयाच्या एवढ्या मोठ्या अंतरावर बोलताना राहुल म्हणाला, ‘नतालाला तिच्या आईसोबत माझे नाते जुळवायचे होते. कारण, माझ्या आणि नतालाच्या आईमध्ये वयाचे कमी अंतर होते. ती म्हणाली होती ‘माझी आई हॉट आहे.’ यावर मी म्हणालो, मला वाटले ती तिच्या आईच्या वयाची असेल तेव्हा ती देखील हॉट दिसेल’

शोमध्ये होस्ट मनीष पॉलने राहुलला विचारले की, जर काही पहिल्यांदा घडले तर त्याला अपघात म्हणतात. पुन्हा असे झाले तर लोक योगायोग म्हणतात. तिसऱ्यांदा ही सवय होऊन जाते. मग राहुलला (Rahul Mahajan) लग्नाची सवय आहे का? यावर राहुलने उत्तर दिले की, एवढी सुंदर वधू पाहिल्यावर तुला लग्न करावेसे वाटणार नाही का?

राहुल महाजनचे शेवटचे दोन लग्न फारच अल्पकाळ टिकले. याचा फारसा त्रास झाला नाही. कारण, त्यांच्यासाठी हे लग्नापेक्षा अल्पकालीन नातेसंबंध होते. लग्नानंतर काही महिन्यांनी वेगळे झाले तर त्याला लग्न म्हणता येणार नाही. लग्न (Marriage) हे एक घट्ट नाते आहे. राहुलने पहिले लग्न श्वेता सिंहसोबत केले होते आणि दुसरे लग्न डिंपी गांगुलीशी केले होते.

नताला रशियन आहे. तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. मी तिला नेहमी सांगतो की पती-पत्नीचे नाते हे शिव-पार्वतीसारखे असावे. मी तिला गीता शिकवतो आणि आम्ही अनेक पौराणिक गोष्टी एकत्र वाचतो, असे राहुल महाजन म्हणाल होता. माझ्या पहिल्या दोन लग्नांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी मी लो प्रोफाईल लग्न करण्याचा विचार केला. मुंबईच्या मलबार हिल्समध्ये चार-पाच मंदिरे आहेत आणि त्या मंदिरांच्या मध्यभागी आमचे लग्न झाले, असा राहुल म्हणाला.

राहुल महाजन चौथ्यांदा लग्न करणार का?

शोमध्ये फ्युचर लूक गेम दरम्यान राहुलला विचारले की, तो चौथ्यांदा लग्न करणार का? यावर राहुल म्हणाला, हो, मी चौथ्यांदा लग्न करेन... पुन्हा एकदा नतालासोबत. चॅनल आमचे लग्न करेल. कुटुंब नियोजनावर राहुल म्हणतो, माझ्याकडे इतकी सुंदर पत्नी आहे. आम्हाला १०-१२ मुलं असावीत. यावर नताला उत्तर देते, नक्की, आम्ही दत्तक घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs USA T20 World Cup : भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली, स्पर्धेतून बाहेर पडणार?

Malegaon Municipal Corporation : मालेगावचा महापौर कोण? इस्लाम पक्ष आणि शिवसेना आमनेसामने; 'एमआयएम'च्या भूमिकेवर गणिते अवलंबून!

मुख्यमंत्र्यांनी दिली चक्क रामदेव बाबांना टक्कर! 'शीर्षासन' करतानाचा व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या शीर्षसनाचे फायदे

Gadchiroli News: सात माओवाद्यांना कंठस्नान, एक जवान हुतात्मा; छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगलात सुरू होती मोहीम!

New IPO : भारतातील पहिला AI आयपीओ 9 फेब्रुवारीला शेअर बाजारात! GMP मध्ये चांगल्या नफ्याची शक्यता; संपूर्ण माहिती इथे...

SCROLL FOR NEXT