Rajkumar Hirani Praised Dunki Movie Actor Shah Rukh Khan  Esakal
मनोरंजन

Shahrukh Khan: पठाणच्या यशानंतर शाहरुख सुसाट! 2 तासात पूर्ण केलं 2 दिवसांच शुटिंग दिग्दर्शकाला बसला शॉक..

सकाळ डिजिटल टीम

 Rajkumar Hirani Praised Shah Rukh Khan:  पठाणच्या दमदार यशानं सर्वांनाच भारवून टाकलं आहे. या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडत हजार कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटानंतर शाहरुख पुन्हा कामावर परतला आहे. शाहरुखला अभिनयाची वेगळीच आवड आहे. गेली 3 दशकापासून तो सर्वांच मनोरजंन करतोय. आता शाहरुख त्याच्या आगामी डंकी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानसोबतच्या शूटिंगबाबत काही खुलासे केले. ते म्हणाले की शाहरुख खान त्याच्या पात्रासाठी किती मेहनती आहे याची मला कल्पना नाही.

तो म्हणाला- शाहरुखसोबत काम करणं खूप आनंददायी आहे पण ते व्यक्त करणं खूप कठीण आहे. जेव्हा तो सेटवर असतो तेव्हा त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि तो नेहमी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवतो. चित्रपटातील पात्रासाठी तो एवढी मेहनत करू शकतो हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं होतं की तो त्याच्या कामाच्या बाबतीत निवांत असेल. पण जेव्हा एखादा अभिनेता आधीच इतका तयार असतो तेव्हा तुमचं काम सोपं होतं.

डंकीमधील शाहरुखच्या भूमिकेबद्दल बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले, 'तो त्याच्या सीनचे व्हिडिओ घरूनच शूट करायचा आणि मला पाठवायचा. कुठलीही भूमिका कशी करायची याच्या 10 ते 15 कल्पना त्याच्याकडे असायच्या. सेटवर जाण्याआधीही तो त्या दिवशी काय करणार आहेत हे मला माहीत असायचं'

'कधी-कधी असंही व्हायचं की मी एका सीनच्या शूटिंगसाठी २ दिवस ठेवायचो पण शाहरुख ते फक्त २ तासात पूर्ण करायचा. त्याचा एक वेगळाच चार्म आहे . भाषेवरची त्यांची पकडही खूप मजबूत आहे. तो 7 वाजता शूटिंगला यायचा, जे पाहून मी थक्क व्हायचे.'

याआधी शाहरुख खानसोबत काम न केल्याबद्दल दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना खंत आहे. ते म्हणाले की, 'शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर मला असं वाटलं की, मी यापूर्वीच त्याच्यासोबत काम करायाला हवं होतं.' शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT