Raju Srivastava health gradually improving says reports know latest health update Google
मनोरंजन

कॉमेडीच्या मंचावर राजू श्रीवास्तव यांचे कमबॅक लवकरच! जाणून घ्या हेल्थ अपडेट

राजू श्रीवास्तव यांचे ब्रेन डेड झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् त्यामुळे चाहते चिंतेत पडले होते.

प्रणाली मोरे

Raju Srivastava: कॉमेडीचे किंग म्हणून ओळखले जाणारे गजोधर भैय्या उर्फ राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून आपल्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चर्चेत पहायला मिळत आहेत. डॉक्टर,त्यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी लेटेस्ट अपडेट मिळत आहे. तर देशभरातील त्यांचे चाहते त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतानाही दिसत आहेत. सध्या तरी असं बोललं जात आहे की कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ज्यावरनं अंदाज लावला जात आहे की ते लवकरच बरे होऊन कॉमेडीच्या मंचावर कमबॅक करतील.(Raju Srivastava health gradually improving says reports know latest health update)

राजू श्रीवास्तवचे खास मित्र सुनिल पाल यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटलं आहे की,''जो माणूस संपूर्ण जगाला हसवतो, तो स्वतः सीरियस किती दिवस राहणार. ते लढवय्ये आहेत, ते लवकरच बरे होऊन कमबॅक करतील''.

काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांनी देखील राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना अपडेट दिली होती. शेखर सुमन यांनी ट्वीटरवर श्रीवास्तव यांच्या हेल्थविषयी अपडेट देताना लिहिलं होतं की,''राजू अजूनही बेशुद्धावस्थेत आहेत,पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे''.

दुसरीकडे राजू यांच्या प्रकृतीसाठी पूर्ण देश प्रार्थना करताना दिसत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी कानपुरच्या इस्कॉन मंदीरात पूजा ठेवली होती. ज्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

एक दिवसापूर्वीच एम्स रुग्णालयाकडून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार,ब्रेन डेडच्या बातम्यांसंदर्भात डॉक्टरांनी अफवा असल्याचं सांगितलं. तसंच,पुढचे २४ तास उपचारांना राजू श्रीवास्तव कसे प्रतिसाद देतात ते पहाणं महत्त्वाचं ठरेल असं देखील ते म्हणाले होते.

राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करताना ट्रेडमिलवरच हृद्यविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरदिवशी त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होताना पहायला मिळत आहे. अर्थात तशा बातम्या तरी समोर येत आहेत. पण सध्याच्या ताज्या बातमीनुसार कळत आहे की राजू श्रीवास्तव लवकरच कॉमेडीच्या मंचावर कमबॅक करतील अशी लक्षणं दिसत आहेत. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : - नागपूर जिल्ह्यातून दोन संशयितांना अटक , पाकिस्तानशी संबंधीत असल्याने एटीएसला शंका

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT