Raju Srivastava & Ayushman Srivastava Google
मनोरंजन

Raju Srivastava Son:बापाचं छत्र हरपलं पण मुलानं करुन दाखवलं;राजू श्रीवास्तवच्या मुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मान कॉमेडीपासून दूर असला तरी त्यानं त्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश खूप कमी वयात मिळवून दाखवलय.

प्रणाली मोरे

Raju Srivastava Son: प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव आज या जगात नसले तरी त्यांच्या कलेच्या रुपानं ते कायम आपल्यात असणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मुलाचे नाव आयुष्मान श्रीवास्तव आहे. जो सितारवादक आहे. लंडन येथे शिकणारा आयुष्मान आपल्या वडीलांप्रमाणेच खूप हुशार आहे. चला जाणून घेऊया राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मान संदर्भात काही खास गोष्टी.

वडीलांप्रमाणे आयुष्माननं कॉमेडीत करिअर करणं पसंत केलं नाही. पण त्याच्यात एक असं टॅलेंट आहे ज्यामुळे त्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.अलिकडेच राजू श्रीावास्तव यांचा मुलगा आयुष्मान आपल्यातील कलागुणांच्या जोरावर सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स सीझन ९ मध्ये दिसला.

हो हे खरं आहे की आयुष्मान श्रीवास्तव एक प्रोफेशनल सितार वादक आहे. तो म्युझिक इंडस्ट्रीत आपल्यातील या टॅलेंटमुळे चांगला ओळखला जातो. सा रे गा मा पा मध्ये जाऊन आयुष्मान श्रीवास्तवनं एक दर्जेदार परफॉर्मन्स दिला. त्या मंचावर त्याच्यातील या टॅलेंटचं खूप कौतूक झालं. त्याला पाहून लोकही म्हणू लागले की आपल्या वडीलंप्रमाणेच हा नाव कमावणार.

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

आयुष्माननं मुंबईमध्ये आपलं शालेय शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तो बीएससी ची ड्रिग्री घ्यायला लंडनमध्ये रवाना झाला. तिथेच त्यानं आपलं बॅचलर ऑफ सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केलं.

आयुष्मान श्रीवास्तवच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अॅमेझॉन प्राइमची वेब सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी' साठी एक लाइव्ह ट्रॅक गायलं गेलं होतं. ज्यात तब्बल १०४६ संगीतकारांनी सहभाग घेतला होता. या लाइव्ह परफॉर्मन्सनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.

जून २०२२ मध्ये राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मानचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी राज भवनात सुंदर परफॉर्मन्स दिल्यामुळे सम्मान केला होता.

Ayushman Shrivastava

आयुष्मान श्रीवास्तव फुटबॉल खेळाचा चाहता आहे. लहानपणापासून त्याला जर्सी कलेक्शनचा छंड जडला आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर फुटबॉलशी जोडलेल्या अनेक पोस्ट पहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT