Rakhi Husband Adil esakal
मनोरंजन

Rakhi Husband Adil : 'तू माझ्या आईला...' राखीचा नवऱ्यावर गंभीर आरोप, शेवटी दाखवलं पोलीस स्टेशन

टीव्ही मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंतच्या संसाराला आता घरघर लागल्याचे दिसून आले आहे. अवघ्या महिनाभर देखील न टिकलेल्या त्या लग्नाला ग्रहण लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Husband Adil : टीव्ही मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंतच्या संसाराला आता घरघर लागल्याचे दिसून आले आहे. अवघ्या महिनाभर देखील न टिकलेल्या त्या लग्नाला ग्रहण लागले आहे. यासगळ्या राखीचा पती आदिल खान दुरानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यासगळ्यात राखीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

राखीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिनं पती आदिलवर गंभीर आरोप केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि आदिलच्या संसारामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वाद निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. आदिलच्या गर्लफ्रेंडचा तनुचा फोटो समोर आला होता. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याचे राखीनं सांगितले आहे. आदिलनं राखीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे.

यासगळ्यात राखीच्या आईचे झालेले निधन ही राखीसाठी मोठी धक्कादायक गोष्ट होती. त्या घटनेनंतर राखीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ सुरु झालं आहे. राखीनं यावेळी तिच्या पतीवर आदिलवर गंभीर आरोप केले आहे. ती म्हणते माझी आई जेव्हा आजारी होते तेव्हा तिच्यावर उपचारासाठी पैसे नव्हते. अशावेळी मी बिग बॉसमध्ये गेले आणि पैसे कमावून आणले. मात्र तेव्हा आदिलनं काहीच मदत केली नाही.

आदिलनं खूप त्रास दिला आहे. माझी आई गेली याला जबाबदार आदिल आहे. त्यानं कोणत्याही प्रकारे मदत केलेली नाही. माझ्या घरच्यांनी त्याला पैशांसाठी खूप विनंती केली मात्र त्यानं काही ऐकलं नाही. मला खूप त्रास झाला आहे. माझी आई गेली आहे. त्यामुळे खरं काय हे मला माहिती आहे.

आता ओशिवारा पोलिसांनी आदिलला अटक केली असून त्यानं राखीकडून पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कलम ४०६ आणि ४२० च्या अंतर्गत आदिलवर गुन्हा दाखल करण्या आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

Gopichand Padalkar : 'आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असेल'; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना थेट इशारा

Diwali 2025: हिंदू शास्त्रांनुसार 'या' 4 रोपांजवळ दिवा लावल्यास वाढते सौभाग्य

IND vs AUS : 'अरे, बॉलिंगवर पण लक्ष द्या'! आर अश्विन संतापला, गौतम गंभीरच्या रणनितीचे केले पोस्टमॉर्टम Video

Gold Price Today: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या–चांदीच्या भावात घसरण; पुढील काही महिन्यांत 1.5 लाखांचा आकडा गाठणार?

SCROLL FOR NEXT