Rakhi Sawant & her Brother Rakesh Sawant Google
मनोरंजन

Rakhi Sawant च्या भावाचा आदिल खान विरोधात खळबळजनक खुलासा; म्हणाला,'आमच्या आईचं निधन झालं त्याच दिवशी..'

राखी सावंतनं पती आदिल खान दुर्रानी विरोधात फसवणूकीचा आणि कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

Rakhi Sawant: बॉलीवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत आली आहे. राखीनं आपला पती आदिल खान दुर्रानी विरोधात फसवणूकीचा आणि कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सध्या आदिलला जामिन मिळालेला नाही आणि तो जेलमध्ये आहे, या दरम्यान राखीचा भाऊ राकेश सावंतने आदिल विषयी खळबळजनक खुलासा केला आहे.

राखी सावंतच्या भावाचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.(Rakhi Sawant brother rakesh sawant revelation says adil khan used to hit her sister badly video viral)

राखी सावंतचं आयुष्य सध्या लाइमलाइटमध्ये आहे. आदिल सोबतचं तिचं वैवाहिक आयुष्य अडचणीत सापडलं आहे. यादरम्यान राखीच्या भावाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये राकेश सावंत बोलताना दिसत आहे की, ''ज्या दिवशी आमच्या आईचं निधन झालं होतं त्या दिवशीच आदिलनं राखीला बेदम मारलं होतं. आम्ही राखीला घेऊन कूपर रुग्णालयात गेलो होतो. तिथे तिच्या काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या. तिच्या शरीरावर माराचे निशाण जर आपण पाहिलात तर तुम्हालाही रडू आवरणार नाही''.

'' मी देखील त्या दिवशी त्याच्याशी बोललो होतो आणि राखीला मारलं त्याविषयी विचारणा केली होती. यासंदर्भात माझे काका आणि कुटुंबातील इतरांनी देखील त्याच्याशी संवाद साधला होता. आम्हा सगळ्यांनाच त्यानं धुडकावून देत आगाऊपणाचं उत्तर दिलं होतं. आणि म्हणाला होता,हे आमचं वैयक्तिक आयुष्य आहे''.

राकेश सावंतने मीडियाशी बातचीत करताना सांगितलं की आदिल राखीला टॉर्चर करायचा. तसंच,अनेकदा तिच्यावर हातातला ग्लासही त्यानं फेकून मारला आहे.

राकेशने हा दे खील खुलासा केला की आदिलनं दुबईमध्ये प्रापर्टी खरेदी करण्यासाठी राखी सावंत कडून मोठी रक्कम उकळली आहे.

तर,राखीनं देखील सांगितलं होतं की,आदिलच्या हातात जे असायचं ते तो फेकून मारायचा. आपण त्याला खूप विरोध करायचो पण तो खूप मारायचा.

पापाराझीसोबत बोलताना राखीनं हा देखील खुलासा केला होता की,''आदिलच्या अटकेनंतर त्याच्या आईचा आपल्याला फोन आला होता. तिनं आदिलच्या विरोधात मी केस का दाखल केली असा सवाल मला केला''.

तेव्हा मी म्हणाले की,''मी तुम्हा सर्वांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तुमच्या मुलाला तर काही समजूनच घ्यायचं नव्हतं. मी त्याची आई आणि काकीला यासंदर्भात सगळं सांगितलं होतं'', असं देखील राखी म्हणाली.

''आदिलची आई मला फक्त 'वो बच्चा है' असं म्हणायची. तो आता ३० वर्षाचा आहे...मी नेहमीच त्याला माफ करत आली आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT