Rakhi Sawant And Adil Khan Google
मनोरंजन

Rakhi Sawant:आधी Liplock अन् आता थेट Bedroom व्हिडीओ शेअर करत राखीनं उडवून दिली खळबळ..नेटकरी भडकले

आदिल खान सोबत आपण सात महिन्यापूर्वीच लग्न केलं असून आपला धर्म देखील आपण बदलल्याचं सांगत राखी सावंतनं खळबळ उडवून दिली होती.

प्रणाली मोरे

Rakhi Sawant: राखी सावंतच्या लग्नाचा खुलासा काही दिवस आधीच झाला आणि लागलीच तिनं आदिलसोबत नातं बिनसल्याचं देखील म्हटलं होतं. राखीच्या म्हणण्यानुसार तिनं आदिलसोबत कायदेशीर लग्न केलं होतं. लग्नाची सगळी कागदपत्र आपल्याजवळ आहेत पण आदिल आता लग्नाला नकार देत असल्याचं म्हणून तिनं खळबळ उडवून दिली होती. भर रस्त्यावर पापाराझीं समोर राखीचा रडण्याचा ड्रामा देखील आपण सगळ्यांनी पाहिला असेल. (Rakhi sawant shared video from bedroom with adil khan)

कधी ती रडताना दिसली तर कधी आपल्या लग्नाची कर्मकहाणी सांगताना दिसली. आता या दरम्यान राखीनं एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे ज्या मागची कथा वेगळीच आहे. कदाचित कहानी में ट्वीस्ट...आता राखी सावंत म्हटलं की भरपूर ड्रामा भरलेलं कथानक असणारच नाही का.

हेही वाचा: आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अन् ते पाहून नेटकरी त्याला राखीचा नवा ड्रामा म्हणून संबोधत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे,'कधी रडते,कधी हसते.माहित नाही हिच्या आयुष्यात काय चाललं आहे'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'अल्लाहवर विश्वास ठेव आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीर रहा'. आणखी एकानं लिहिलं आहे,'राखी तुझं चाललंय काय?', एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'राखी तुला लाज वाटली पाहिजे.स्वतःचा धर्म बदललास पण त्या मुलानं तसं केलं नाही'.

काही दिवसांपूर्वीच राखीनं आपल्या लग्नाचा खुलासा केला होता. तिनं आपल्या लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट देखील शेअर केलं होतं. तिनं दावा केला होता की ७ महिन्यापूर्वीच तिनं लग्न केलं होतं. आपला धर्म बदलून तिनं नाव फातिमा ठेवल्याचं देखील सांगितलं. राखीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात तिनं हिजाब परिधान केला होता.

राखीचा व्हिडीओ पाहून चाहते आता थोडे कन्फ्यूज आहेत. एकीकडे राखी आदिलवर आरोप लावताना दिसली तर दुसरीकडे त्याच्यासोबत रोमॅन्टिक होतााना दिसली. राखी स्वतः व्हिडीओ बनवतेय आणि तिच्यासोबत आदिल खान आहे. दोघं एकमेकांच्या गालावर किस करताना दिसत आहेत. राखी आणि आदिलचा हा व्हिडीओ बेडरुममधला आहे. तिनं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की,'मेरे पति,माय लव्ह आदिल'. आता आदिलनं देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपलं राखीसोबत लग्न झाल्याचं कबूल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT