Rakhi sawant shocking confessions about sonali phogat pa sudhir sangwan  Instagram
मनोरंजन

Sonali Phogat: राखी सावंतचा खळबळजनक खुलासा; म्हणाली,'सोनालीच्या PA नेच...'

राखी सावंतने सोनाली फोगाट यांचा PA सुधीर संगवान याच्यावर संशय व्यक्त करत काही धक्कादायक दावे केले आहेत.

प्रणाली मोरे

Sonali Phogat:बिग बॉस 14 च्या स्पर्धक सोनाली फोगाट यांचे गोव्यात निधन झालं होतं. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचं कारण सुरुवातीला हार्टअटॅक असं म्हटलं गेलं होतं. पण गोवा पोलिसांच्या मते सोनाली फोगाट यांना एका पार्टीमध्ये चोरून ड्रग्ज दिलं गेलं होतं. आणि ज्यानंतर त्यांचे निधन झाले. सोनाली यांच्या कुटुंबाने त्यांचा PA सुधीर सांगवान सोबत इतर काही लोकांवर त्यांच्या हत्येचा आरोप केला आहे. ज्यानंतर प्रकरण पूर्ण गुंतागुंतीचं झालं आहे. या केसमध्ये अद्याप तपास सुरु आहे. काही जणांना अटकही झाली आहे. आता यादरम्यान राखी सावंतने(Rakhi Sawant) खळबळजनक खुलासा केला आहे.काय म्हणाली आहे राखी सावंत?(Rakhi sawant shocking confessions about sonali phogat pa sudhir sangwan)

राखी सावंतनं सोनाली फोगाट यांच्या मृत्यूसंदर्भात म्हटलं आहे की,'जेव्हा मला सोनाली फोगाट यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा पहिल्या दिवसापासून मला ती एक हत्याच वाटत होती. सोनाली फोगाट यांना कट करुन मारण्यात आलं आहे, बिग बॉसमध्ये आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला होता. सोनाली फोगाट यांचे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं. आणि त्यांचा जो PA होता सुधीर सांगवान याच्या त्या प्रेमात होत्या असं देखील आम्हाला त्यावेळी म्हणाल्या होत्या. ते त्यांचे PA देखील होते आणि मित्र देखील होते. आता यापेक्षा जास्त मी त्या हयात नसताना बोलू शकत नाही. हे खूप चुकीचं होईल. हार्टअटॅक सोनाली फोगाट यांना आलाच नसेल. आता ज्या काही अंतर्गत गोष्टी दडल्या आहेत ते CBI आणि पोलिस शोधून काढतीलच''.

यानंतर राखी सावंत पुढे म्हणाली की,''मी व्हिडीओ पाहिला होता,त्यांच्या अंगावर कपडे देखील नव्हते. हे पाहून मला धक्काच बसला होता,मी दुबईत होते. सोनाली फोगाट यांचे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होते. मला भाजपा पक्षाला ही विनंती करायची आहे की,ज्याने कुणी सोनाली फोगाटना मारल्याचा डाव रचला होता,त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी. त्यांच्या त्या PA नेच त्यांच्या मुलीला अनाथ केलं आहे. मला खूप आधीपासूनच त्याच्यावर संशय होता. मी त्याला जवळपास १० वेळा तरी भेटले आहे. जितक्यांदा त्याला पाहायचे,तेवढ्या वेळेस त्याचा राग यायचा मला. मी सोनाली फोगाटना विचारायचे,हा कोण आहे? तेव्हा त्या म्हणायच्या, कोणी नाही, माझा PA आहे,आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. पण मला त्याच्या चेहऱ्यावरनं तो एक क्रिमिनल वाटायचा. आणि अखेर आज ज्याची मला भीती वाटत होती ते घडलंच. मला याविषयी खूप वाईट वाटत आहे''.

राखी सावंत आधी बिग बॉस १४ फेम अर्शी खाननं देखील सोनाली फोगाट यांच्या मृत्यूविषयी दुःखं व्यक्त केलं होतं. तसंच,सोनालीला न्याय मिळावा यासाठी आवाजही उठवला होता. एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत करताना अर्शी खान म्हणाली होती,''फक्त बिग बॉस सुरु होतं तेव्हाच नाही तर शो संपल्यानंतरही मी आणि सोनाली फोगाट संपर्कात होतो. आम्ही खूप वेळा भेटलो आहोत,एकत्र वेळ घालवला आहे. त्यांनी मला नेहमीच एका आईप्रमाणं माया केली आहे. मी जेव्हा शूटिंग वर असायचे तेव्हा त्यांचे माझ्याकडे लक्ष असायचे, माझ्याबाबतीत त्या खूप प्रोटेक्टिव्ह होत्या''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT