Ram Setu first day boxoffice collection, better than 'Thank God'
Ram Setu first day boxoffice collection, better than 'Thank God' Google
मनोरंजन

Ram Setu: अक्षयवर प्रभूराम प्रसन्न! 'रामसेतू'नं पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड...

प्रणाली मोरे

Ram Setu: अक्षय कुमारचा नवा सिनेमा रामसेतूनं बॉक्सऑफिसवर मोठा धमाका केला आहे. या सिनेमानं ओपनिंग डे ला १५ करोडची कमाई केली आहे. दिवाळीच्या मुहूर्ताला या सिनेमानं अजयच्या 'थॅंक गॉड'ला मागे टाकल्याचं बोललं जात आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'रामसेतू' सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग फार काही चांगलं नव्हतं,त्यामुळे अंदाज लावला जात होता की हा सिनेमा फक्त १२ ते १३ करोडचा बिझनेस करेल. पण मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा सिनेमा पहायला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. दिवसभरातील सगळ्याच शोज ना प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. 'रामसे' च्या तुलनेत 'थॅंक गॉड'ने पहिल्या दिवशी फक्त ८.१ करोड रुपयांची कमाई केल्याचं दिसून आलं.('Ram Setu' first day boxoffice collection,better than 'Thank God')

रामसेतू एक अॅडव्हेंचर ड्रामा आहे. ही गोष्ट एका नास्तिक आर्कियोलॉजिस्टची आहे,जो रामसेतूच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो. याच शोधा दरम्यान प्रभूरामचंद्रावर त्याची श्रद्धा जडते. मंगळवारी भारताच्या कितीतरी सिनेमागृहात प्रेक्षकांनी सिनेमा पाहता-पाहताच 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या. रिलीजनंतर पहिल्या दिवशी 'रामसेतू'ला बॉक्सऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. आता सध्या तरी चित्र दिसत आहे की येणाऱ्या काही दिवसांत सिनेमाला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल.

'रामसेतू' देशभरात जवळपास ३१०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचं बजेट ८५ करोड सांगितलं जात आहे. आणि याबाबतीत इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की राम सेतू सोबतच मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड' सिनेमा रिलीज झाला आहे. तर हॉलीवूडचा 'ब्लॅक अॅडम' देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. देशातील मोठ्या शहरांतील मल्टिप्लेक्समध्ये फारसा चांगला प्रतिसाद 'रामसेतू' ला मिळाला नसला तरी राजस्थान,छत्तीसगड मध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमानं ओपनिंग डे रोजी तगडी कमाई केली आहे. राजस्थानमध्ये या सिनेमानं पहिल्या दिवशीच १ करोडहून अधिक कमाई केली आहे.

'रामसेतू'नं उत्तर प्रदेश,बिहार,छत्तीसगड, गुजरात मध्ये पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर आपली पकड घट्ट केली आहे. मुंबईत सिनेमानं ५ करोडहून अधिकची कमाई केली आहे. दिवाळीच्या मुहूर्ताला गुजरात,सौराष्ट्र सारखे विभाग कमाईसाठी महत्त्वाचे ठरतात. पहिलं वाटत होतं की कॉमेडी जॉनर असल्या कारणाने गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये 'थॅंक गॉड' समोर राम सेतू टिकाव धरणार नाही, पण झालं उलटच. या सिनेमानं पहिल्या दिवशीच चांगला बिझनेस केल्याचं दिसून आलं.

दक्षिण भारतात मात्र रामसेतू फारसा चालेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही. पण तरीदेखील 'ब्रह्मास्त्र' नंतर साऊथ मध्ये अधिक कमाई करणारा सिनेमा म्हणू 'रामसेतू'कडे पाहिलं जाऊ शकेल. अक्षय कुमारचे 'बच्चन पांडे','सम्राट पृथ्वीराज','रक्षाबंध' हे सिनेमे बॉक्सऑफिसवर जोरदार आपटले. अशामध्ये 'रामसेतू' ला मिळालेला रीस्पॉन्स ही जमेची बाजू म्हणता येईल अक्षयच्या बाबतीत. अर्थात,हा सिनेमा अक्षयच्या याआधी रिलीज झालेल्या 'सुर्यवंशी' सिनेमा इतका चालेल की नाही याबाबतीत शंकाच आहे. २०२१ मध्ये दिवाळीला रिलीज झालेल्या 'सुर्यवंशी'नं ओपनिंग डे ला २६ करोडची कमाई केली होती.

रामसेतू ची कमाई वर्ड ऑफ माऊथनं वाढण्याची मात्र शक्यता नक्कीच आहे. लोक सिनेमा पाहून त्याची प्रशंसा करताना दिसत आहेत आणि ही गोष्ट सिनेमाला फायदेशीर ठरू शकते. खासकरुन ही गोष्ट यासाठी देखील महत्वाची आहे कारण रामसेतू आणि थॅंक गॉड या दोन्ही सिनेमांना ६ दिवसांचा मोठा वीकेन्ड मिळाला आहे एवढंच नाही तर चित्रगुप्त पूजा, भाऊबीज,छठ पूजा या सुट्ट्यांचा देखील फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या थिएटरमध्ये आणखी वाढलेली दिसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तोंदलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT