Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Updates | Ranbir Alia Wedding Ceremony Live Updates sakal
मनोरंजन

Ranbir Alia Wedding: अखेर लग्नबंधनात अडकले.. मिस्टर अँड मिसेस कपूर रात्री कॅमेऱ्यासमोर

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलीया भट यांचा विवाह आज दुपारी ३.३० च्या दरम्यान पार पडला. सायंकाळी विधीनंतर ते...

नीलेश अडसूळ

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचे लग्न कधी होणार याकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागले होते. हा एखादा जागतिक सोहळा असावा अशी त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आहे. हे लग्न एप्रिल मध्ये होणार या अंदाजापासून ते १५ ला होणार, १६ ला होणार, १७ ला होणार असे अनेक अंदाज चाहत्यांनी बांधले. यावर कुटुंबीयांनीही माहिती देणे टाळले. अखेर काल रात्री नीतू कपूर यांनी आज १४ एप्रिल रोजी विवाह होणार असल्याचे सांगितले. सकाळपासून त्यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. पण अखेर लग्न लागले असल्याची माहिती समोर आली आहे. (Ranbir Alia Wedding Ceremony Live Updates)

गेल्या दोन दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. राहत्या घरी, चेंबूर येथील आर के स्टिडिओ, वांद्रे येथील 'वास्तू' बंगला, आलियाचे घर इथे रोषणाई, सजावट, खानपान यांची जय्यत व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळपासून अनेक कलावंतर वास्तू बंगल्यावर येत होते. पण हे लग्न किती वाजता होणार हे कुणीही सांगायला तयार नव्हते.

या विवाह सोहळ्याला कालपासून सुरवात झाली. बुधवारी सकाळी ११ वाजता रणबीर आणि आलियाचा लग्नाआधीचा गणेशपूजन विधी पार पडला. या सोहळ्याला केवळ घरातील काही मंडळी उपस्थिती होती. दुपारी २ नंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरु झाला. बघताबघता रात्री संगीतही झाले . या सर्व कार्यक्रमात केवळ मोजक्यांच माणसांना आमंत्रण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी ३.३० च्या दरम्यान हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, महेश भट, पूजा भट, सोनी राजदानी, करण जोहर, करीना, सैफ, रीमा जैन आणि अन्य काही मंडळींनी हजेरी लावली.

आज सायंकाळी लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील. त्यानंतर रणबीर आणि आलिया कॅमेऱ्यासमोर येणार अशी माहिती मिळाली आहे. कारण दोघांनीही लग्न होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही बातमी बाहेर येऊ दिली नाही, एवढेच काय तर लग्नाची तारीखही सांगितली नाही. काल रात्री नीतू कपूर यांनी माहिती दिली म्हणून आज लग्न होणार असल्याचे समजले. अखेर हे लग्न पार पडले असून आता मिस्टर अँड मिसेस कपूर चाहत्यांसमोर कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. रात्री ८ च्या दरम्यान ते कॅमऱ्यापुढे येतील असा अंदाज काही माध्यमांनी दिला आहे.

तर दोन दिवसांनी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आहे. आता हे रिसेप्शन नेमके कुठे असेल याबाबतही एकमत नाही. काहींनी ताज हॉटेल, काहींनी आरके हाऊस तर काहींनी रणबीरच्या वांद्रे येथील 'वास्तू' बांगला इथे १०० लोकांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती दिली आहे. आज रात्री रणबीर आलिया कॅमेऱ्यासमोर आल्यावरच त्याबाबत नेमकी माहिती मिळेल. तूर्तास कपूर कपल कधी बाहेर येतंय याची वाट अनेकजण पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना !रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT