Ranbir Kapoor & Alia Bhatt Google
मनोरंजन

रणबीर-आलियाच्या लग्नात जेवणातून 'नॉनव्हेज' आऊट? चक्क 25 काऊंटर 'वेगन'

रणबीरची नववधू आलिया भट्ट ही शाकाहरी असल्याकारणानं कपूरांनीनहा निर्णय घेतला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचं सर्वात मोठं आणि चर्चेत राहणारं लग्न आता लवकरच होणार आहे. बॅंड,बाजा,बारात आता दूर नाही. बी-टाऊनच्या या लग्नातल्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा हळूहळू लीक झाल्या. कपूर-भट्ट फॅमिलीने चुप्पी साधली असली तरी मीडियाच्या माध्यमातून रणबीर(Ranbir Kapoor)-आलियाच्या(Alia Bhatt) चाहत्यांपर्यंत लग्नापासून-हनिमून डेस्टिनेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत. येत्या आठवड्यात रणबीर-आलियाच्या लग्नाचा बार उडणार आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी कन्फर्म केलंय की हा विवाहसोहळा १४ एप्रिलपासून पुढे चार दिवस रंगणार आहे. रणबीरनं तर त्याच्या राहत्या इमारतीमधील एक हॉल चक्क ८ दिवसांसाठी बूक केला आहे. आणि तिथं लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. आलियाच्या काकांनी लग्नाविषयी कन्फर्मेश दिलं असताना रणबीरची आई नीतू कपूर(Neetu Kapoor) मात्र याविषयी काहीच बोलायाला तयार नाहीत.

पण मीडिया मागे हटणाऱ्यातील थोडीच आहे. आता चक्क लग्नातील मेन्यूच्या डिटेल्सही लीक झाल्या आहेत. कपूर खानादन खूप फूडी आहे हे काही नवीन नाही. खाण्याचे शौकीन असलेल्या कपूरांच्या लग्नात म्हणूनच विविध पदार्थांची जंगी मेजवानी असणार यात शंकाच नाही. कळतंय की नीतू कपूर यांनी लग्नासाठी खास दिल्ली,लखनौहून शेफ बोलावलेयत. भारतीय आणि परदेशी जेवणाची रेलचेल या लग्नात पहायला मिळणार आहे, लग्नात दिल्लीच्या प्रसिद्ध चॅटचा वेगळा काऊंटर असेल. पण आलिया शाकाहरी आहे त्यामुळे तब्बल २५ काऊंटर हे शाकाहारी पदार्थांचे असणार आहेत.

नुकतचं आलिया जिथे राहते त्या घराला पाच-सहा जणं डेकोरेट करताना दिसलेयत. खरंतर आलियाचे ते घर रणबीरच्या इमारतीच्या जवळच्याच इमारतीत आहे. झगमगत्या लाइट्स आणि फुलांची सजावट आलियाच्या घराला केलेली दिसून आली. आलियाच्या घरातनं गेल्या दोन दिवसात काही व्यक्तिंना अनेक गोष्टींची ने-आण करताना पाहिलं गेलं. हे सगळं खूप शांत पद्धतीनं केलं जातंय,लग्नाच्या घरात असतो तसा आवाज,गोंधळ न करता सारं पार पाडलं जात आहे. हे सगळं असलं तरी चर्चा सुरु झालीय ती पक्के मांसाहरी असलेल्या कपूराच्या लग्नात लागणाऱ्या २५ शाकांहारी पदार्थांच्या काऊंटरची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT