Alia Bhatt and Ranbir Kapoor Google
मनोरंजन

आलिया-रणबीरचं रीसेप्शन मुंबईत पंचतारांकित हॉटेलात; बुकिंग डीटेल्स कळाल्या

बॉलीवूडकरांसाठी आलिया-रणबीर १७ एप्रिल रोजी हे ग्रॅंड रीसेप्शन देणार आहेत. काल रात्री उशिरा दोघे बुकिंगसाठी गेले होते याचा मीडियाला छडा लागला.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) हे काही मोजक्याच आप्तेष्टांच्या आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे अर्थातच या दोघांनी बॉलीवूडकरांसाठी वेगळं ग्रॅंड रीसेप्शन ठेवलं आहे. या रीसेप्शनला कोण-कोण असणार याची एक लिस्टही लीक झाली आहे. त्यात करण जोहर,शाहरुख खान, हृतिक रोशन,राणी मुखर्जी,कतरिना कैफ,सिद्धार्थ मल्होत्रा,अर्जुन कपूर,आदित्य रॉय कपूर,वरुण धवन आणि अजुनही बऱ्याच नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

पिंकव्हिला वेबसाईला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियानं रीसेप्शनसाठी मुंबईतील ताज महल पॅलेसची निवड केली आहे. हे रीसेप्शन १७ एप्रिल रोजी ठेवण्यात येणार आहे. लग्नानंतर आलिया आणि रणबीर शूटिंगमध्ये बिझी असतील त्यामुळे रीसेप्शन लग्नानंतर लगेच ठेवल्याचं बोललं जात आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघांना ताजमध्ये रात्री बूकिंगसाठी जाताना पाहिलं गेलंय. ज्याच्या बुकिंग डीटेल्सही कळाल्या आहेत.

रणबीर आपल्या काही खास मित्रांना बॅचलर पार्टीही देणार आहेत. ज्या पार्टीत बॉलीवूडमधीलही त्याच्या खास मित्रांचा समावेश असेल. ही पार्टी १६ तारखेला रात्री होणार असल्याचं बॉम्बे टाईम्स वृत्तपत्रानं सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितलं आहे. या पार्टीत आलिया-रणबीर त्यांच्या काही खास ५० मित्रांसोबत धमाल करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT