ranbeer kapoor and alia bhatt  google
मनोरंजन

आर के हाऊसमध्ये रणबीर आलिया घेणार सात फेरे,माहीती झाली उघड..

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलीय भट यांच्या लग्नाबाबतच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ते दोघे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कपूर घराण्याच्या आर के हाऊस मध्ये लग्न करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नीलेश अडसूळ

बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलिया भट (alia bhatt) हे कपल सध्या चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर आलिया ही जोडी चाहत्यांना खूप भावते. अद्याप या दोघांनीही त्यांच्या लग्नाविषयी कोणताही खुलासा केला नाही. परंतु त्यांच्या लग्नाबद्दल वारंवार बोलले जात आहे. यंदाच्या वर्षी ते विवाह बंधनात अडकतील अशी बातमी बॉलिवूड मधून मिळाल्याने चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. या बहुप्रतीक्षित लग्नाबाबत आता रोज नवी माहिती समोर येत आहे. हे लग्न एप्रिल महिन्यात होईल असा अंदाज काहींनी वर्तवला होता. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसते आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये म्हणजे या महिन्यात लग्न करणार आहेत, त्यासाठीचे ठिकाण देखील ठरलेले आहे. हे जोडपे एखाद्या भव्य हॉटेल किंवा डेस्टिनेशनवर जाऊन लग्न करणार नसून चक्क घरात लग्न करणार आहे. हे घर साधे सुधे नाही. कपूर घराण्याच्या वडिलोपार्जित घर असलेल्या आर.के. हाऊसमध्ये ते लग्न करणार आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलने दावा केला आहे की हे लग्नाचे ठिकाण रणबीर कपूरनेच ठरवले आहे. विशेष म्हणजे रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनीही २० जानेवारी १९८० मध्ये याच आर के हाऊसमध्ये लग्नगाठ बांधली होती.

'एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकणार असून अंदाजे ४५० लोक या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. हे लग्न एप्रिल अखेर व्हावे यासाठी कपूर घराणे उत्सुक होते परंतु आलियाचे आजोबा (आईचे वडील) नरेंद्रनाथ राजनाथ यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे हे लग्न लवकर उरकले जात आहे.' अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरनेही लग्नाच्या तारखेबाबत उत्तर दिले होते. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, 'माध्यमांसमोर तारीख जाहीर करायला मला काही वेड्या कुत्र्याने चावले नाही. सध्या मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की आलिया आणि मी दोघेही लग्न करण्याचा विचार करत आहोत. मला आशा आहे की ते लवकरच होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT