Alia Bhatt and Ranbir Kapoor were supposed to get married on April 14. Google
मनोरंजन

आलिया-रणबीरचं लग्न Postponed! भट्ट कुटुंबाची मीडियाला मोठी माहिती

आलिया-रणबीरचं लग्न १४ एप्रिलला आर.के हाऊसमध्ये होत आहे याचं कन्फर्मेशन भट्ट कुटुंबानेच दोन दिवसांपू्र्वी दिलं होतं.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor)-आलिया भट्टच्या(Alia Bhatt) लग्नाची चर्चा चहूबाजूला रंगली असताना,वातावरणात 'रणबेलिया' रंग भरला असताना आता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसणार आहेत ही बातमी ऐकून. सगळा आनंदाचा रंगच पार उतरुन जाणार आहे. कारण आता बातमी कानावर येतेय की आलिया-रणबीरचं लग्न म्हणे पुढे ढकलण्यात आलं आहे. हे दोघे १४ एप्रिललला लग्नबंधनात अडकणार होते. आधी १७ एप्रिल ठरलेली तारिख आता १४ एप्रिलपर्यंत आली होती. पण चला,लग्न होणार हे तर पक्क ठरलं होतं. पण आता ते पुढे ढकलण्यात येतंय हे जरा जास्तच नाही का. सर्वसामान्य चाहत्यांच्या उत्साहावर पाणी सोडायचं काम का करतात हे बडे सेलिब्रिटी. आता ज्या आलियाच्या काकांनी म्हणजे रॉबिन भट्ट(Robin Bhatt) यांनी १४ एप्रिलला लग्न होतंय हे कन्फर्म केलं होतं,आता त्याच भट्ट फॅमिलीकडून कळतंय की हे लग्न पुढे ढकललं गेलं आहे. आणि एवढं बोलून पुढे तारिखही सांगितली नाही. असं असतं का कुठे राव?

आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहूल भट्टनं(Rahul Bhatt) एका मुलाखती दरम्यान आज १२ एप्रिलला ही ब्रेकिंग बातमी दिली आहे. तो म्हणाला,''लग्न १४ एप्रिलला होणार नाही. आणि १३ एप्रिलला देखील विवाहासंबधित सोहळे पार पडणार नाहीत''. काही दिवसांपूर्वी, आलिया भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी मीडियाला सांगितलं होतं, की १३ तारखेला मेहेंदी सोहळा रंगणार आहे. आणि कपूर फॅमिलीच्या आर.के हाऊसमध्ये लग्नसोहळा पार पडेल. आर.के हाऊसही गेल्या चार-पाच दिवसांत रोषणाईनं झगमगलेलं दिसत होतं. तिथे लग्नतयारीची लगबगही टिपली गेली होती. पण मध्येच भट्ट कुटुंबानं थेट मीडियाकडेच लग्न पुढे ढकलल्याचं सांगितल्यानं सर्वसामान्य चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत.

'आज तक' वाहिनीला राहूल भट्टनं दिलेल्या माहितीनुसार, रणबीर-आलियाचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. म्हणे लग्नाची तारिख मीडियात लीक झाल्यामुळे लग्न पुढे ढकललं गेलं. तो म्हणाला,'' लग्न होणार आहे,आणि होईल तेव्हा सर्वांना कळेलच. पण आता १४ एप्रिलला ते होणार नाही. ना १३ तारखेला विवाहाचे इतर कोणते सोहळे रंगणार आहेत. खरतंर आधी तारिख पक्की ठरली होती पण ती तारीख मीडियात लीक झाल्यामुळे आता ती बदलण्यात आलीय. आमच्यावरही यासगळ्याचं दडपण आलंच आहे. पण मी हे ठामपणे सांगतो की १३,१४ एप्रिलला लग्न आणि त्यासंबंधित कोणतेही सोहळे पार पडणार नाहीत. लवकरच लग्नाची तारीख आम्ही जाहिर करू''.

आलियाचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. आज तक वाहिनीनं यासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांना संपर्क साधला असता ते म्हणाले,रणबीरची आई नीतू कपूरनं याविषयी कुठेही काही बोलू नका असं सांगितलं आहे. तर मग मी त्यांच्या या विनंतीचा अवमान कसा करू.

आलिया आणि रणबीर यांची जोडी जुळली ती ब्रह्मास्त्र च्या सेटवर. अयान मुखर्जीनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २०१८ मध्ये दोघांनी सोनम कपूरच्या लग्नात एकत्र हजेरी लावून आपल्या नात्याचा नबोलता खुलासा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT