Ranbir-Ananya advertisement esakal
मनोरंजन

Ranbir-Ananya: तुम्ही बापलेकी दिसताय, त्या जाहिरातीवरुन रणबीर ट्रोल...

रणबीर कपूर आणि अनन्या पांडेचा रोमान्स प्रेक्षकांना आवडला नाही...

सकाळ डिजिटल टीम

नुकताच आमिर खानच्या जाहिरातीला जोरदार विरोध होत असल्यामुळे तो चर्चेत आहे. त्यातच रणबीर कपूर आणि अनन्या पांडेच्या जाहिरातीची चर्चा होउ लागली आहे. नाही नाही, जाहिरातीत तसं काहिच चुकीचं नाहिये,तर लोकांना त्याची जोडीच खटकली आहे. त्याच्या जोडी प्रेक्षकांना आवडलेली नाही.त्यामूळे दोघांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. ट्रोलिंगचे कारण आहे त्याच्या वयातील अंतर...

रणबीर आणि अनन्या दोघांची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन कॅमेरा शेअर करताना दिसत आहेत. एका एथनिक वेअर ब्रँडच्या जाहिरातीत ते रोमँटिक कपल म्हणून दिसतात. या जाहिरातीत ती दोघ एकमेंकासोबत न बोलता मनातल्या मनात बोलताय. त्याच्या हावभावातुन ते एकमेंकाना समजून घेत आहेत. त्या दोघांत क्यूट केमेस्ट्रि दाखवण्याचा प्रर्यत्न या जाहिरातीत करण्यात आला आहे. मात्र या दोघांच्या जोडीला त्याच्या चाहत्यांनी प्रेम दिलेले नाही तर उलट या जोडीला पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. रणबीर कपूर 40 वर्षांचा आहे तर अनन्या फक्त 23 वर्षांची आहे. त्यामूळे दोघांच्या वयातील फरकामुळे देखील प्रेक्षकांना त्यांच्यातील रोमान्स आवडत नाहिये.

त्यांची जाहिरीत पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना दोघांची जोडी आवडतेय. त्यांनी अनन्या आणि आलियाची तुलना केली आहे.  रणबीरची जोडी आलियापेक्षा अनन्यासोबत जास्त चांगली दिसल्याचं बोललं जातय. तर या उलट एकाने लिहिले, 'या दोघांनी या जाहिरातीला हो का म्हटले, अनन्या रणबीरच्या लहान बहिणीसारखी दिसते'. दुसऱ्याने या जोडीला बाप लेकीची जोडी म्हंटलय. तर एकाने विंनती केलीय कि कृपया या दोघांना कोणत्याही चित्रपटात एकत्र कास्ट करू नका.

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत चित्रपटात तर रश्मिका मंदान्नासोबतही 'पशु' या चित्रपटात दिसणार आहे. तर अनन्याच्या आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 मध्ये आणि सिद्धार्थ चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत अनन्या 'खो गये हम कहाँ' चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

SCROLL FOR NEXT