Ranbir Kapoor and Rashmika Mandanna’s leaked pics from Animal shoot go viral Google
मनोरंजन

'Animal' च्या सेटवरुन रणबीर-रश्मिकाचा फोटो लीक; सुपर क्यूट दिसली नवी जोडी

'Animal' सिनेमाच्या निमित्तानं रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) लग्न झाल्या झाल्या तीन-चार दिवसांत शूटिंगसाठी निघालेला दिसला,मुंबई ए्अरपोर्टवर त्याला स्पॉट केलं अन् त्याच्या 'अॅनिमल' सिनेमाची चर्चा सुरु झाली. अर्थात बॉलीवूडचा हॅन्डसम अभिनेता रणबीर कपूर आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) 'अॅनिमल'(Animal) सिनेमात एकत्र काम करणार याची बातमी जेव्हापासून कानावर आली तेव्हापासूनच सिनेमाविषयी उत्सुकता होती. रणबीर-रश्मिका पडद्यावर कसे दिसतील हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असणारच. आता रणबीर-रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे 'अॅनिमल' सिनेमाच्या सेटवरुन या दोघांचे फोटो लीक झाले आहेत. आणि यामुळे बॉलीवूडच्या या नव्या फ्रेश जोडीचा लूकही सर्वांना दिसला आहे.

या फोटोत रणबीर आणि रश्मिका शूटिंगसाठी सज्ज दिसत आहेत. रणबीरनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला आहे तर रश्मिका लाल रंगाची साडी नेसलेली आहे. मनालीतील रहदारीच्या रस्त्यांवर या शूटिंगचा सेट लागलेला आहे. फोटोसोबतच रणबीर-रश्मिकाचा शूटिंग करतानाचा एक व्हिडीओही लीक झालाय. हा व्हिडीओ ज्या चाहत्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यानं ''मी आता रणबीरला पाहिलं का?' असं आश्चर्याचा धक्का लागल्यावर जशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया निघते तशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

संदीप रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' या सिनेमाचं शूटिंग २२ एप्रिलपासून मनालीत सुरु झालं आहे. या सिनेमाचं शूटिंग ज्या दिवशी सुरु झालं त्या दिवशी शूटिंगच्या सेटवरचा एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. पण त्यात रणबीर-रश्मिका कुठेच नव्हते. पण आता थेट सिनेमातला रणबीर-रश्मिकाचा फोटो लीक झाल्यानं या अॅक्शन कॉमेडी सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अॅनिमल सिनेमात रणबीर-रश्मिका एकत्र सुपर क्यूट दिसत आहेत अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा सिनेमा हिंदीसोबतच सर्व दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

आजचे राशिभविष्य - 14 ऑक्टोबर 2025

पचन न झाल्यावर शरीराची प्रतिक्रिया

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT