Ranbir Kapoor And alia bhatt wedding guest list leak... Google
मनोरंजन

Ranbir Alia Wedding: शाहरुख ते दीपिका;आलियाच्या भावानं सांगितली गेस्ट लिस्ट

बॉलीवूडच्या मित्रपरिवारासाठी वेगळं रीसेप्शन 'ताज' मध्ये देण्यात येणार असूनही लग्नातही काही खास सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात येणार आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी दर तासाला एक नवीन अपडेट येत आहे. दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाला घेऊन फारच उत्सुक असलेले पहायला मिळत आहेत. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या तयारी संदर्भातले फोटो-व्हिडीओ जसे एकीकडे व्हायरल होत आहेत,तसंच दुसरीकडे लग्नात हजर राहणाऱ्या पाहुण्यांच्या लिस्टविषयी देखील उलट-सुलट अफवा पसरवल्या जात आहेत.

आतापर्यंत रणबीर-आलियाच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळच्या मित्रपरिवारातील लोकं उपस्थित राहणार असं बोललं जात होतं. आणि रीसेप्शनमध्ये बॉलीवूडच्या खास लोकांना निमंत्रण असणार आहे. पण नेमकं कोण-कोण हजेरी राहणार हे कळलं नव्हतं. आता आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्टनं लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या लिस्टविषयी माहिती दिली आहे. राहुलनं एका मुलाखतीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी भरपूर माहिती दिली आहे.

लग्नातील गेस्ट लिस्टचा देखील त्यानं खुलासा केला आहे. राहुल भट्टनं दिलेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलिया च्या लग्नात केवळ २८ लोकांनाचा निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये रणवीर सिंग,दीपिका पदूकोण,अयान मुखर्जी,शाहरुख खान,करण जोहर अशी मोठी नावं सामिल आहेत. याव्यतिरिक्त घरातील जवळचे कुटुंबिय लग्नासाठी हजर राहणार आहेत.

अद्याप लग्नाच्या गेस्ट लिस्टला घेऊन कोणतीच अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या लग्नात प्रसिद्ध डीझायनर सब्यासाचीचे आऊटफिट्स परिधान करणार आहेत. रणबीरच्या इमारतीच्या गेटमधून आत एक भलीमोठी बॅग गेली,त्यावर सब्यासाची लिहिलं होतं,जिला मीडियाच्या कॅमेऱ्यानं बदिस्त केलं. यामुळे ही गोष्ट तरी तुर्तास कन्फर्म आहे.

लग्नाआधीच कपूर कुटुंबियांचा मुंबईस्थित चेंबूर इथं असलेल्या आर.के स्टुडिओला रोषणाईनं सजवलेलं आहे. ज्याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार १५ एप्रिलला रणबीर-आलिया सात फेरे घेणार आहेत. पण अद्याप लग्नाच्या तारखेविषयी कपूर किंवा भट्ट कुटुंबाकडून अधिकृत माहिती आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT