Ranjinikanth overwhelmed after watching rishabh shetty kantata calls it masterpiece Google
मनोरंजन

Kantara: ब्लॉकबस्टर 'कांतारा'ने सुपरस्टार रजनीकांतला केलं भावूक,म्हणाले,'ऋषभ शेट्टी तुला पाहिल्यावर...'

'कांतारा'ची प्रशंसा करताना रजनीकांतनी केलेल्या ट्वीटवर आता सिनेमातील अभिनेता ऋषभ शेट्टीनं 'आपलं स्वप्न पूर्ण झालं' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणाली मोरे

Kantara: होंबाळे फिल्म्सचा 'कांतारा' प्रेक्षकांसह आता सेलिब्रिटींचेदेखील लक्ष वेधून घेत आहे. सर्वत्र चर्चेचा विषय असलेला हा चित्रपट, प्रदर्शित झाल्यापासून दिवसेंदिवस अधिक यशस्वी होत आहे. अनेक भारतीय मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारा ऋषभ शेट्टी अभिनीत 'कांतारा'बद्दल आपले विचार मांडले आहेत. चित्रपटाने त्याच्या कन्नड आणि हिंदी आवृत्त्यांसह जवळजवळ सर्व चार्ट्समध्ये अव्वल स्थान पटकावले असून, 'कांतारा'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.

कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर २.३५ कोटी रुपयांची कमाई झाली. IMDb द्वारे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 'कांतारा' हा कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम आहे.

'कांतारा'बद्दल बोलताना, सुपरस्टार रजनीकांत सोशल मीडियावर म्हणाले आहेत,“लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ऋषभ तुझे अभिनंदन!" रजनीकांत यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर ऋषभचं कौतूक करताना लिहिलं आहे- ''ज्ञानापेक्षा अज्ञान मोठं ठरतं आणि ते कशाप्रकारे ...हे कांतारापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणच सांगू शकलं नसतं. तुझा अभिनय पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तुझं लेखन,दिग्दर्शन,अभिनय सगळ्यालाच माझा सलाम. या मास्टरपीस चित्रपटाच्या संपू्र्ण टीमचं अभिनंदन''.

Ranjinikanth overwhelmed after watching rishabh shetty kantata calls it masterpiece

रजनीकांतच्या या ट्वीटला उत्तर देत ऋषभने लिहिलं आहे की,''तुम्ही भारताचे सर्वात मोठे सुपरस्टार आहात. मी लहानपणापासून तुमचा चाहता राहिलो आहे. तुमच्या या प्रशंसेनं मी धन्य झालो. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. तुम्ही तुमच्या अनेक सिनेमातून,त्यांच्या कथांमधून,तुमच्या अभिनयातून अनेक स्थानिक गोष्टींचे रहस्य सांगितले आहे,त्यांचे महत्त्व सांगून प्रेरणा दिली आहे. या सगळ्यासाठी आभारी आहे मी तुमचा''.

कांतारा सिनेमाची प्रशंसा याआधा अनेक साऊथच्या बड्या स्टार्सनी केली आहे. तसंच, कंगनानं तर चक्क 'सिनेमा ऑस्करला पाठवा' म्हणत कौतूक केलं होतं,तर 'द काश्मिर फाईल्स'च्या विवेक अग्निहोत्रींनी 'मास्टरपीस' म्हणत कांताराला गौरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT