Complaint file against Ranveer Singh for his nude photoshoot  esakal
मनोरंजन

Ranveer Singh बोल्ड फोटो; या अभिनेत्याविरोधातही झालेली तक्रार

न्यूड फोटोशूटसंदर्भात रणवीरविरोधातच नाही तर मिलिंद सोमणविरोधातही तक्रार करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

रणवीरनं केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे जिकडे तिकडे रणवीरचीच चर्चा सुरू आहे. एका मॅगझीनसाठी केलेल्या न्युड फोटोशुटमुळे रणवीर चर्चेत आला (Social Media Viral News) असून त्याच्या फोटोशुटवर अनेक बॉलीवुड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता मात्र त्याच्याविरोधात मुंबई पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. त्याचं हे न्युड फोटोशुट त्याला महागात पडलं आहे. दोन वर्षाआधी मिलिंद सोमणलाही न्युड फोटोशुट महागात पडलं होतं. (not only against ranveer singh but also against milind soman Complaint file for his nude photoshoot)

काय होती तक्रार

मुंबई पोलीसांत करण्यात आलेल्या तक्रारीत रणवीरवर महिल्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय. रणवीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्याक्षणापासूनच त्याचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे चर्चेत आहे. अशीच एक तक्रार मिलिंद सोमणविरोधातही पणझी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.गोवा पोलिसांनी मॉडेल मिलिंद सोमणविरुद्ध अश्लीलतेचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.आपल्या वाढदिवसानिमित्त गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावत असल्याचे चित्र पोस्ट केल्यानंतर गोवा सुरक्षा मंच (GSM) या राजकीय संघटनेने या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

एकीकडे त्याच्यावर नुकताच महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप झालाय तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक करत त्याचं समर्थन केलंय. बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने तर 'जर महिलांनी असं फोटोशूट केलं तर त्याचं कौतुक आणि पुरूषाने केलं तर वाईट' असे म्हणत रणवीरचं समर्थन केलं आहे.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रावर भन्नाट वायरल झाले आहेत. त्याचा हा फोटोशूट ब्लर्ट रेनॉल्डच्या फोटोशूटची प्रेरणा घेत केला गेला आहे. ब्लर्ट रेनॉल्डने असाच एक फोटोशूट कॉस्मोपॉलिटन मॅक्झिनसाठी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT