Ranveer Singh Throwback Video: Esakal
मनोरंजन

Ranveer Singh: 'तू नंबरचा 'डबल ढोलकी'! केआरके रणवीरवर इतका का भडकला?

Ranveer Singh Throwback Video: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग कॉफी विथ करण 8 मध्ये आले होते. या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Koffee With Karan 8: करण जोहरचा सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असलेला शो 'कॉफी विथ करण'चा 8वा सीझन 26 ऑक्टोबरपासून सुरू झाला. आठव्या सिझनची सुरुवात बॉलिवूडचे पावर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या जोडीने झाली.

यावेळी रणवीर आणि दीपिकाच्या जोडीची अनेक सिक्रेट चाहत्यांना कळाली आहे. या सिझनमध्ये त्यांनी लग्नाचा व्हिडिओ देखील चाहत्यांना दाखवला आहे. त्याचबरोबर या दोघांनी त्यांची लव्ह स्टोरी चाहत्यांना सांगितली. पहिली भेट कशी आणि कुठे झाली हे रणवीरने सांगितले. मात्र हे सांगताना रणवीरने एक चुक केली ज्यामुळे सोशल मिडियावर तो प्रचंड ट्रोल होत आहे.

जेव्हा रणवीर सिंगने दीपिकाला भेटल्याची कहानी सांगितली तेव्हा त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचे जुने व्हिडिओ शेअर करत त्याच्यावर टिका केली. आता हाच व्हिडिओ अभिनेता कमाल राशीद खान याने देखील सोशल मिडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ शेयर करत रणवीरला ट्रोल केलं आहे.

या शोमध्ये रणवीरने सांगितले की, दीपिकासोबत त्याची पहिली भेट वर्सोवा येथील संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती.

रणवीरने सांगितले की, जेव्हा तो राम-लीलाच्या स्क्रिप्टवर चर्चा करण्यासाठी भन्साळींच्या घरी गेला तेव्हा तो टेबलाजवळ बसला होता आणि दरवाजा समोर होता. संजय लीला भन्साळी समुद्राजवळ राहतात, त्यामुळे दार उघडून समुद्रातून वाऱ्याची झुळूक येताच दीपिका आत आली तिने पांढरी चिकनकारी परिधान केली होती.

मात्र हिच लाईन रणवीर यापुर्वी देखील बोलला होता मात्र ते दिपीकासाठी नव्हे तर अनुष्कासाठी. अनुष्कासोबत त्याची पहिली भेट यशराज फिल्म्सच्या ऑफिसमध्ये झाली होती. त्याने हिच स्क्रिप्ट तेव्हाही सांगितली.

आता हा व्हिडिओ शेयर करत केआरकेनं लिहिलंय की, "ये है ढोलकी ! लबाड #RanveerSing एकाच शोमध्ये अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोनबद्दल एकच गोष्ट सांगत आहे!" सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी रणवीरला ट्रोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT