Ranveer Singh, Deepika Padukone Google
मनोरंजन

रणवीर-दीपिकाच्या आयुष्यात 'छोटी दीपिका';पोस्ट करुन सांगितले...

सोशल मीडियावर अभिनेत्याच्या पोस्टमुळे भलतीच चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

रणवीर-दीपिका(Deepika Padukone) यांनी सहा वर्षांच्या रीलेशनशीपनंतर २०१८ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. त्यामुळे जो-तो आता त्यांच्याकडे विचारणा करतोय,बाबांनो कधी तुमच्या घरी आता ज्युनिअर रणवीर(Ranveer Singh) किंवा ज्युनिअर दीपिका येणार. आता त्यांच्या नंतर लग्न झालेल्या प्रियंकानेही सरोगसीच्या माध्यमातून का होईना पण आई होण्याचा निर्णय घेतलाच की. पण आता त्यांच्या सगळ्या चाहत्यांना रणवीरनं एक व्हिडीओ पोस्ट करून स्वतःच्या 'मन की बात' सांगितली आहे.

रणवीरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो एका लहान मुलीचा आहे. त्यात ती मुलगी 'रामलीला' या दीपिका-रणवीरच्या सुपरहिट सिनेमातील दीपिकानं साकारलेल्या लीलाच्या पेहरावात दिसत आहे. इतकंच नाही तर तिने अगदी सिनेमातल्या दीपिकाच्या एका डायलॉगची हुबेहूब नकल करत सर्वांचे मनोरंजन केलं आहे. रणवीरनं हा व्हिडीओ शेअर करीत दीपिकालाही टॅग केला आहे. त्या व्हिडीओला शेअर करताना त्यानं कॅप्शन दिलं आहे की,''मरे लीला जैसी कोई नही. 'छोटी दीपिका' पहा. मला तुझे एक्सप्रेशन्स खूप आवडले''. असं त्यानं त्या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.

आता रणवीरच्या या कॅप्शनवरनं मात्र अंदाज लावला जातोय की रणवीरला लवकरच दीपिकाकडून तिच्याच मिनी व्हर्जनची म्हणजे छोट्या दीपिकाची अपेक्षा आहे. 'रामलीला' हा रणवीर-दीपिकाचा पहिला एकत्र केलेला सिनेमा. आणि असं म्हणतात याच सिनेमापासून या दोघांमध्ये जवळीकता वाढली. हा सिनेमा विल्यम शेक्सपीयर यांच्या रोमिओ-ज्युलिएटच्या ट्रॅजिक रोमॅंटिक ड्रामावरनं प्रेरित होऊन बनवलेला सिनेमा आहे असं म्हटलं जातं. या सिनेमात सुप्रिया पाठक,रिचा चड्ढा,शरद केळकर,गुलशन देवियाह आणि बरखा बिष्ट अशा अनेक कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. दीपिका आणि रणवीरनं या सिनेमा व्यतिरिक्त 'बाजीराव मस्तानी','83' अशा सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. आणि ऑनस्क्रीनही त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. असो,आता रणवीरच्या मनातील छोट्या दीपिकाची इच्छा मोठी दीपिका लवकरच पूर्ण करो यासाठी शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

विसर्जन न होताच परतणार गणरायाची मूर्ती, असा निर्णय घेण्यामागची मंडळाची नेमकी भावना काय? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Daund Crime : दौंड येथे तरूणाचा निर्घृण खून; चार संशयित आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT