Raveen Tandon On Affair WIth Akshay kumar Esakal
मनोरंजन

Raveena Tandon: अनेक वर्षांनी अखेर अक्षयसोबतच्या नात्यावर बोलली रवीना.. शिल्पा शेट्टीचाही उल्लेख करत केलं हैराण..

रवीना -अक्षय- शिल्पा यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाची चर्चा १९९० च्या काळात भरपूर गाजली होती.

प्रणाली मोरे

Raveena Tandon: अभिनेत्री रविना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेअरविषयी सर्वांनाच माहित आहे. दोघांचं अफेअर एकेकाळी बॉलीवूडच्या हॉट टॉपिकपैकी एक होतं. अर्थात दोघांपैकी कोणीही याविषयी आतापर्यंत बोललं नव्हतं पण अनेक वर्षांनी रवीना टंडन अखेर आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी म्हणजे अक्षयविषयी बोललीच आहे.

रवीनानं अक्षयसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. बॉलीवूड अभिनेत्रीनं खुलासा केला आहे की तिचं अक्षयसोबत भले नातं तुटलं असेल तरी देखील ती अक्षयसोबत एक चांगलं नातं शेअर करते. रवीना टंडन १९९० च्या दशकात अक्षय कुमारसोबत एका सीरियस रिलेशनशीपमध्ये होती.

एका नवीन मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली की, अक्षय आणि ती एकमेकांचा खूप सम्मान करतात. ती म्हणाली,''अक्षय आणि मी आतादेखील मित्र आहोत. तुम्ही एकमेकांचा आदर करत पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मी त्याच्याविषयी आजही विचार करते आणि तो चांगल्या उद्दिष्टानं करते. मला वाटतं की तो आपल्या इंडस्ट्रीच्या मजबूत आधारस्तंभांपैकी एक आहे''.(Raveen Tandon On Affair WIth Akshay kumar)

अक्षय कुमारचं रवीनाशी ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा शेट्टीला तो डेट करत होता अशा बातम्या पसरल्या होत्या. अशा कथित बातम्यांवर बोलताना रवीना म्हणाली,'' शिल्पा आणि मी खूप खास मैत्रिणी आहोत आता. काही खास गोष्टी आमच्यात आहेत ज्या आम्हाला जोडून ठेवतात. काही असे अनुभव आहेत ज्यांनी आम्हाला एकत्र बांधून ठेवलं आहे. शिल्पा आणि शमिता दोघीही माझ्या नवऱ्याच्या खास मैत्रिणी आहेत. आम्ही एकमेकांच्या चांगल्या-वाईट प्रसंगात सोबत असतो''.

अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी एक सुखद धक्का बसला कारण या महिन्याच्या सुरुवातीला एका फॅशन इव्हेंटमध्ये दोघांना बाजूबाजूला बसलेलं पाहिलं गेलं. अक्षय आणि रवीनाचे एकत्र बसलेले, एकमेकांची गळाभेट घेण्याचे आणि गप्पा मारतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर चाहत्यांमध्ये चैतन्य पसरलं.

त्यानंतर रवीनानं अक्षय कुमारसोबतच्या आपल्या नात्यावर भाष्य केलं. अभिनेत्रीनं खुलासा केला की त्यादरम्यान वृत्तपत्रात तिच्याविषयी जे लिहिलं जायचं ते वाचायचं ती टाळायची.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यात 'मोहरा' सिनेमाच्या दरम्यान सूत जुळलं. आणि १९९४ मध्ये त्यांनी डेटिंग सुरु केलं. रवीनाच्या म्हणण्यानुसार १९९० सालाच्या शेवटी तिचा आणि अक्षयचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि दोघांच्या नात्याचा दी एन्ड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT