Rasha Thadani Fulfilled Her Promise Esakal
मनोरंजन

Rasha Thadani: 'एक बार जो मैंने कमिटमेंट दी..', रविनाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल! काय आहे प्रकरण

Vaishali Patil

Rasha Thadani Fulfilled Her Promise: बॉलिवूड कलाकर हे नेहमी लाईम लाईटमध्ये असतात. मग त्याचे चित्रपट असो किंवा काही व्हायरल व्हिडिओ. चाहते त्यांच्याबद्दल अनेक अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सूक असतात. त्याचबरोबर या कलाकारांच्या मुलांबद्दलही अनेक चर्चा होत असते.

त्यांचे व्हिडिओ आणि फोटो नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मग त्यात अजय देवगणची मुलगी न्यासा असो किंवा शाहरुखचा मुलगा आर्यन खान. त्यातच आता काही दिवसांपासून रवीना टंडनची मुलगी राशा हिच्या नावाची देखील चर्चा होत आहे.

रवीनाची मुलगी राशा ही अभिनय जगतापासून दूर असली तरी तिची चर्चा होत असते. नेटकऱ्यांना तिचा साधेपणा खुप भावतो. आता तर ती पापाराझींची आवडती बनली आहे.

राशा थडानीने नुकतचं मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ज्याचे फोटो रविनाने देखील शेयर केले होते. जेव्हा तिला मुंबई विमानतळावर पापाराझींनी गाठलं तेव्हा त्यांनी तिच्याकडे मिठाई मागितली.

त्यावेळी राशाने त्यांना पुढच्या वेळी भेटल्यावर नक्कीच मिठाई घेऊन येईल असं वचन दिलं होतं.

आता राशानं तिचे वचन पुर्ण केले आहे. यावेळी राशा थडानी मुंबई विमानतळावर दिसली तेव्हा तिने सोबत मिठाई आणली. राशाने सगळ्यांसाठी काजू कतली आणली. हायस्कूल ग्रॅज्युएशनबद्दल अभिनंदन करणाऱ्या फोटोग्राफर्सना तिने ही मिठाई वाटली.

राशाने स्वतः पापाराझींना स्वतःच्या हातांनी मिठाई वाटली. काजू कतली वाटताना राशा म्हणतेय की मागच्या वेळी प्रॉमिस केलं होत ना म्हणुन मिठाई आणली. राशा यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ती व्हाइट टॉप आणि पिंक बॉटम परिधान केलेली दिसते

राशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. तिचं रविनाने खुप चांगल्या प्रकारे संगोपण केलं असल्याचं नेटकरी बोलत आहे.

रवीना टंडनने तिच्या ग्रॅज्युएशन हायस्कूलची बातमी शेअर करण्यासाठी तिची मुलगी राशाची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आई-मुलीची जोडी खूपच क्यूट दिसत होती.

राशा अभ्यासात हूशार आहेच त्याचबरोबर ती उत्तम गायकही आहे एवढेच नाही तर राशा थडानी तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे.

आता ती अभिनयात पदार्पण करणार का असा प्रश्न अनेकवेळा नेटकरी रविनाला विचारत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT