Vikun-Taak
Vikun-Taak 
मनोरंजन

Vikun Taak Review : मनोरंजनासह सामाजिक विषयावर भाष्य करणारा 'विकून टाक'!

संतोष भिंगार्डे

मराठी चित्रपट - विकून टाक

आपल्या चित्रपटातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या समीर पाटील यांनी आता विकून टाक हा चित्रपट आणला आहे. त्यांनी 'पोश्‍टर बॉईज' व 'पोश्‍टर गर्ल' यांसारख्या चित्रपटातून मनोरंजन करता करता सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता आलेल्या विकून टाकमध्ये त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करता करता चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

'यलो'सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तसेच 'बालक पालक' व 'डोक्‍याला शॉट' असे चित्रपट बनविणाऱ्या उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा धामणगावात घडणारी आहे. मुकुंद तोरांबे अर्थात मुक्‍या (शिवराज वायचळ) आणि कान्या (रोहित माने) हे दोन जीवलग मित्र.

मुक्‍या दुबईहून आपल्या गावात परततो. त्याच्या आईने म्हणजे यमुनाबाईने (वर्षा दांदळे) त्याचे लग्न ठरविलेले असते. मुक्‍याचे लग्न ज्या दिवशी असते त्याच दिवशी बॅंकेची नोटीस त्याला येते. कारण त्याच्या वडिलांनी कर्ज घेतलेले असते. ही बाब जेव्हा मुलीकडील मंडळींना समजते तेव्हा ते लग्न लावण्यास नकार देतात. साहजिकच मुक्‍या, त्याची आई, बहीण तसेच मित्र कान्या गोंधळात पडतात. काय करावे आणि कसे करावे हेच त्यांना सुचत नाही. त्याच वेळी त्याचा मित्र कान्या त्याला धीर देतो.

कान्याचे भंगार विकण्याचे दुकान असते तेथे मुुक्‍या जातो आणि एका रात्री पार्टी करीत असताना एक घटना घडते व संपूर्ण कथानक वेगळे वळण घेते. पोलिस इन्स्पेक्‍टर डोंगरे (ऋषिकेश जोशी) मुक्‍याच्या मागे लागतात. अब्दुल लतीफ (चंकी पांडे) दुबईतून या गावात येतो आणि सगळा उंदीर-मांजराचा गमतीशीर खेळ सुरू होतो.

दिग्दर्शक समीर पाटीलने ही कथा हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने मांडलेली आहे. चंकी पांडेचे मराठीतील पदार्पण नक्कीच यशस्वी झालेले आहे. त्यांनी अब्दुल लतीफच्या भूमिकेत वेगळीच मजा आणली आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे चित्रपटातील गंमत अधिक वाढते आणि त्या भूमिकेबद्दल अधिक उत्सुकता ताणली जाते. शिवराज वायचळ, राधा सागर, समीर चौघुले, रोहित माने, ऋषिकेश जोशी, जयवंत वाडकर, ऋतुजा देशमुख, राधा सागर अशा सगळ्याच कलाकारांनी छान अभिनय केला आहे.

विशेष म्हणजे रोहित माने कमालीचा भाव खाऊन गेला आहे. नकारात्मक पण विनोदी अंगाने जाणाऱ्या पोलिस इन्स्पेक्‍टर डोंगरेची व्यक्तिरेखा ऋषिकेशने लिलया साकारली आहे. या भूमिकेचे बेअरिंग त्याने बरोबर पकडले आहे. चित्रपटातील गाणीही दमदार आहेत, सिनेमॅटोग्राफर सुहास गुजराथीने आपली कामगिरी चोख केली आहे. पण चित्रपट नको तितका ताणण्यात आला आहे. विशेष करून कोर्टाची दृश्‍ये ताणण्याता आली आहेत. त्यामुळे गंमत हरवते असे वाटत असताना शेवटी एक चांगला सामाजिक संदेश देऊन होतो. सामाजिक विषयावर भाष्य करणारा आणि मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.

दर्जा : साडेतीन स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT